पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Yerawada Pune Crime News | पायी जाणार्याला तिघा जणांच्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवून तरुणाच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्यात आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांपैकी एकाला अटक केली आहे. (Arrest In Robbery Case)
याबाबत अमोल रामसिंग राठोड (वय ३४, रा. अशोकनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय लक्ष्मण ससाणे (वय २६, रा. गांधीनगर, येरवडा) याला अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील अशोकनगरमध्ये ११ जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजता घडला होता. (Yerawada Police)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल राठोड हे वाहनचालक म्हणून काम करतात. ते रात्री पायी घरी जात होते. त्यावेळी अशोकनगरमध्ये तिघांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. राठोड यांनी घाबरुन पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. पोलिसांनी अक्षय ससाणे याला पकडले. त्याच्याकडील चोरीच्या मोबाईलवरुन राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी आपल्याला चाकूचा धाक दाखवून लुबाडले असल्याचे सांगून तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करीत आहेत.