ADV

Yerawada Pune Crime News | पुणे : दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, नराधमावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Crime News | पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. येरवडा परिसरात एका 14 वर्षाच्या मुलीला दुचाकी शिकवण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील चाळे (Obscene Things) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) 42 वर्षीय नराधमावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.(Yerawada Pune Crime News)

याबाबत पिडीत मुलीच्या आईने मंगळवारी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावरुन खाजा अमुद्दीन कामठान (वय-42 रा. येरवडा, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ) पोक्सो अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी रस्त्यावर सायकल चालवत होती.

त्यावेळी फिर्यादी राहत असलेल्या परिसरातील आरोपी खाजा कामठाने याने मुलीला गाडी शिकवतो असे म्हणून तिला गाडीवर बसवले. त्यानंतर आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिला अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पिडीत मुलीने याबाबत आईला सांगितले. पिडीत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केला.
तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 11 जून 2024 या कालावधीत खराडी (Kharadi), नऱ्हे परिसरातील हॉटेलमध्ये घडला आहे.
याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने मंगळवारी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार कमलेश बळीराम मेढे Kamlesh Baliram Medhe (वय-24 रा. कलवड, पुणे) याच्यावर
आयपीसी 376, 376/2/एन, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Rape Case Pune)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baner Pune Crime News | पुणे : अनैतिक संबंधातुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून, बाणेर परिसरातील घटना; गुन्हे शाखेने ठाणे जिल्ह्यातून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Cheating With US Woman | ज्वेलर्सने अमेरिकन महिलेला घातला गंडा, 6 कोटींमध्ये विकला 300 रुपयांचा बनावट दागिना

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal | ना मंगलाष्टका, ना फेरे, अन्य धर्मातील जहीर सोबत रजिस्टर मॅरेज करणार सोनाक्षी?, ‘या’ दिवशी असेल रिसेप्शन!

Gautam Adani | डिफेन्स सेक्टरमध्ये वाढणार गौतम अदानींचा दबदबा… UAE च्या कंपनीसोबत मोठी डील, बनवणार ड्रोन आणि मिसाईल