Yerawada Pune Crime News | पुणे : सेक्युरिटीज कंपनीला सव्वा कोटीचा गंडा, दोन एजंटवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Crime News | सिक्युरिटीज कंपनीच्या नावाने बँकेत बनावट खाते उघडून ग्राहकांकडून त्यामध्ये पैसे घेऊन एक कोटी 28 लाखांची कंपनीची व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). या प्रकरणी कंपनीच्या दोन एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ग्राहकांना कंपनीची गॅरंटी रिटन देऊन फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रॉफिट मार्ट सेक्युरिटीज प्रा. लि. कल्याणी नगर (Profitmart Securities) पुणे व नाशिक (Nashik) येथे घडला आहे. (Yerawada Pune Crime News)

याबाबत सुनिलकुमार सत्यकुमार सिंग (वय-39 रा. मगरपट्टा सिटी, कासाफेलीस, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रोहित सतीश बोडके Rohit Satish Bodke (रा. शिवाजीनगर, नांदगाव, मनमाड, नाशिक), अनिल गोपीचंद चव्हाण Anil Gopichand Chavan (रा. वाघदारदी रोडी, मनमाड, नाशिक) यांच्यावर आयपीसी 420, 408, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित बोडके हा फिर्य़ादी यांच्या प्रॉफीट मार्ट सेक्युरिटीज प्रा. लि. या कंपनीमध्ये अधिकृत एजंट म्हणून नोकरीला होता. त्याने त्याचा साथीदार अनिल चव्हाण याच्यासोबत संगनमत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या नावाने एचडीएफसी बँकेत बनावट खाते उघडले. आरोपींनी कंपनीच्या सेबी गाईडलाईन्सच्या सूचनांचे उल्लंघन केले.

कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून 1 कोटी 28 लाख रुपये घेतले.
आरोपींनी कंपनीची परवानगी न घेता ग्राहकांना फिर्यादी यांच्या कंपनीची गॅरंटी रिटन दिली.
रोहित बोडके व अनिल चव्हाण यांनी फिर्यादी यांच्या कंपनीची व कंपनीच्या अनेक ग्राहकांची
आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Raj Thackeray | मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं, राज ठाकरेंना म्हणाले ”सुपारी बहाद्दरांवर…”

Sunita Khedekar | पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सुनिता खेडेकर यांचे निधन

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘तुम्ही आमच्या गँगला दम देता का’
म्हणत दोघांवर कोयत्याने वार, दहशत पसरवणाऱ्या चार जणांना अटक

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या मुंबईतील कोणत्याही सभेत
काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत नाहीत : प्रकाश आंबेडकर