Yerawada Pune Crime News | पुणे : येरवडा येथील तारकेश्वर मंदिरात चोरी, दोन लाखांची रोकड लंपास

Yerawada Pune Crime News | Pune: Theft at Tarakeshwar temple in Yerwada, cash worth Rs 2 lakh looted

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Crime News | पुण्यातील येरवडा भागातील पर्णकुटी टेकडीवर (Parnkuti Tekdi Pune) असलेल्या तारकेश्वर मंदिरातील (Tarkeshwar Temple Pune) दानपेट्या फोडून (Donation Box) चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.4) मध्यारात्री दीड ते पहाटे पावणे सहाच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Yerawada Pune Crime News)

याबाबत सुधीर वसंतराव वांबुरे (वय-67 रा. येरवडा गाव, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्णकुटी टेकडीवरील तारकेश्वर मंदिराचे मुख्य लोखंडी दरवाजाचे स्लायडिंगचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सहा स्टीलच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडून भाविकांनी दान केलेली रोख रक्कम चोरुन नेली.

चोरट्यांनी दान पेटीतून नोटा व नाणी असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास फिर्य़ादी मंदीरात आले असता उघडकीस आला. त्यांनी याबाबत येरवडा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रुममेटचे दागिने चोरणारा गजाआड

धनकवडी : फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सहकाऱ्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार 20 एप्रिल ते 1 जून या कालावधीत धनकवडी येथील समीर सोसायटीतील फ्लॅट नं. 202 मध्ये घडला आहे.
ऋषिकेश विठ्ठल वाघमोडे (वय-32 रा. मु.पो. अर्जापुर ता.करमाळा जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत रामचंद्र शामराव कणसे (रा. समीर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादी हे समीर सोसायटीत एका 2 BHK फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या खोलीत राहतात.
फिर्यादी नोकरीनिमित्त बाहेर गेले असताना आरोपीने फिर्यादी यांच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
खोलीतील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर कणसे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gautam Adani | गौतम अदानी आता नाहीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…, 16 महिन्यानंतर मिळाले होते स्थान, शेयर बाजार त्सुनामीत गेला मुकुट

Parvati Pune Crime News | पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले, 8 जणांविरोधात गुन्हा

Katraj Pune Crime News | पुणे : घरात घसून महिलेवर बलात्कार करुन मारहाण, पाच जणांवर FIR

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती