पुणे : Yerawada Pune Crime News | बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून फिरणार्या सराईत गुन्हेगारास येरवडा तपास पथकाने त्याच्या अल्पवयीन साथीदारासह पकडले. त्याच्याकडून १ पिस्टल व १ काडतुस असा ३० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. (Pistol Seized)
रोहन रमेश पवार Rohan Ramesh Pawar (वय १८, रा. पगडे वस्ती, चर्होली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) तपास पथकाचे हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे २६ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराचे मागे दोन संशयित थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहे. ही माहिती मिळाल्यावर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व त्यांचे सहकारी यांनी मिळालेल्या माहितीनुसार तेथे जाऊन रोहन पवार याला व एका अल्पवयीन मुलाला पकडले. त्याच्याकडून १ पिस्टल व काडतुस असा ३० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या गुन्हात अभिजित उमेश अवचरे (वय १८, रा. पिसोळी) आणि शाम संतोष गायकवाड (वय १९, रा. झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनाही अटक करण्यात आली आहे. (Yerawada Pune Crime News)
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke),
पोलीस निरीक्षक छगन कापसे (PI Chhagan Kapse), पल्लवी मेहेर (PI Pallavi Mehare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील (PSI Swapnil Patil), हवालदार दत्ता शिंदे,
तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे,
प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केली आहे़.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा