पुणे : Yerawada Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दाखल केलेली केस मागे घे, अशी धमकी देऊन दोघा भावांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार (Koyta Attack) करुन जबर जखमी केले.
याबाबत आकालसिंग महेलसिंग भादा (वय ३२, रा. बालाजीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंदसिंग रघुवीरसिंग भादा (वय ३०), मेवासिंग रघुवीरसिंग भादा (वय २७, दोघे रा. बालाजीनगर, बाल न्यायालयासमोर, येरवडा) या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी रात्री दहा वाजता फिर्यादीच्या घरी घडला. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना दोघे भाऊ त्यांच्या घरात शिरले. त्यांनी आमचेवर केलेली केस मागे घे, असे म्हणून फिर्यादींना धमकाविले. त्यांनी केस मागे घेण्यास नकार दिल्यावर त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच पाठीवर मारले आहे. त्यांना सोडविण्यासाठी त्यांची पत्नी व वहिनी मध्ये आल्या. त्यांनी या दोन्हींनाही शिवीगाळ करुन मारहाण करुन जखमी केले आहे. पोलीस हवालदार चलसाणी तपास करीत आहेत.