Yerawada Pune Crime | पुणे : अश्लील हावभाव करत महिलेचा व अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Crime | घरासमोर उभा राहून एका व्यक्तीने महिलेकडे व आठ वर्षाच्या मुलीकडे पाहून अश्लील हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) 47 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.19) दुपारी चारच्या सुमारास येरवडा परिसरात घडला आहे.

याबाबत 28 वर्षीय महिलेने रविवारी (दि.21) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर बन्सी साळवे Shankar Bansi Salve (वय-47 रा. गणेश नगर येरवडा) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट नुसार (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरा समोर आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील कृत्य करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच महिलेच्या दिराच्या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे पाहून असभ्य वर्तन करुन तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.(Yerawada Pune Crime)

शाळेत महिलेचा विनयभंग

लोणीकंद (Lonikand) : शाळेच्या आवारात थुंकण्यास मनाई केल्याच्या कारणावरून कर्णबधिर निवासी विद्यालयातील
एका शिक्षकाने महिला कर्मचाऱ्याला अश्लील बोलून विनयभंग केला. हा प्रकार 8 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घडला आहे.
याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने रविवारी (दि.21) लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून आण्णासाहेब शिरसाठ (रा. डुडुळ गाव, आळंदी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

Baramati Lok Sabha | भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस

Lohegaon Pune Crime | पुणे : मैत्रिणीसोबत ठेवले संबंध, अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर केला व्हायरल

Baramati Lok Sabha | बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का? अजित पवार म्हणाले, 7 मे पर्यंत भावनिक…