Yerawada Pune Firing Case | येरवडा गोळीबार प्रकरण : तीन सराईत गुन्हेगारांसह पाच जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Yerawada Pune Firing Case | पुण्यातील येरवडा परिसरात गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.19) रात्री एकच्या सुमारास घडली. आकाश चंडालिया याने विकी चंडालिया याच्यावर गोळीबार केला. ही घटना येरवडा येथील अग्रेसन स्कूल (Agrasen School) समोर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आकाश चंडालिया याच्यासह पाच जणांना अटक केली आहे.

याबाबत विकी चंडालीया याचा लहान भाऊ राहूल राजू चंडालिया (वय-26 रा. जयजवान नगर, गुरुद्वारा रोड, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश सतिश चंडालिया, अक्षय सतिश चंडालिया (दोघे रा. रेंन्जहिल्स, शिवाजीनगर, पुणे), अमन सतिश चंडालिया, अभिषेक शाम चंडालिया, संदेश संतोष जाधव (सर्व रा. जयजवान नगर, येरवडा), सुशांत प्रकाश कांबळे (रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा), संकेत तारु यांच्यावर आयपीसी 307, 388, 506, 143, 144, 147, 148, 149, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आकाश चंडालिया, अमन चंडालिया, संदेश जाधव, अभिषेक चंडालिया व सुशांत कांबळे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी चंडालिया हा रात्री दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी आकाश त्याच्या काही मित्रांसोबत आला आणि त्याने विकीला आडवले. आकाशने विकीकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आकाशने विकीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पिस्तुल रोखून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात एक गोळी विकीच्या पोटात लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच विकीवर धारदार हत्याराने डोक्यात व पाठीमागील बाजूस वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 विजय मगर (DCP Vijaykumar Magar),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
(ACP Arti Bansode), पोलीस निरीक्षक जगदाळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन पाच जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये आकाश चंडालिया याच्यावर येरवडा आणि लोणावळा पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे
दाखल आहेत. तर अक्षय चंडालिया याच्यावर येरवडा आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
तसेच सुशांत कांबळे याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून परदेशी महिलेची सुटका

Sanjay Kakade | संजय काकडेंची नाराजी दूर करण्याचे भाजपाचे प्रयत्न, आशिष शेलारांनी घेतली भेट

Pune Rape Case | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; चिराग मुकेश निहलानी वर गुन्हा दाखल