Yerwada Jail Exhibition | कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’वर, कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (बासित शेख) – मकर संक्रांती (Makar Sankranti) सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन (Yerwada Jail Exhibition) उद्योग विक्री केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता (Addl DGP Amitabh Gupta) यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी (Yerwada Jail Exhibition) उपलब्ध करून देण्यात येतील, असे गुप्ता यावेळी म्हणाले.

 

यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे (Swati Sathe), मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ (Sunil Dhamal), येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे (Yerwada Central Jail) अधीक्षक शिवशंकर पाटील (Shiv Shankar Patil), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी उपस्थित होते.

 

 

कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात, असे सांगून गुप्ता म्हणाले,
बंदीजनांना (Prisoners) त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून
दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते.
बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात.
कायद्यानुसार बंद्यांना पुरवणे आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा कारागृह विभागाच्यावतीने उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही ते म्हणाले.

 

गुप्ता पुढे म्हणाले, शासनाच्या विविध विभागाकडून कारागृह उत्पादित टेबल, खुर्ची, कपाटे, गणवेश,
सतरंजी, साड्या, फाईल्स आदी वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
परंतू बंदीजनांनी तयार केलेल्या नवनवीन कल्पक व दर्जेदार वस्तूंची प्रसिद्धी व नागरिकांना खरेदी करता
येण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध सणांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कारागृह उत्पादित
वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावे (Yerawada Jail Exhibition) आयोजित करण्यात येत असतात.
कारागृह उत्पादित वस्तूंची मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत,
अशीही माहिती त्यांनी दिली.

 

हे प्रदर्शन व विक्री 26 जानेवारी पर्यंत उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह ,येरवडा पुणे येथे सुरु राहणार आहे.

 

Web Title :- Yerwada Jail Exhibition | Jail manufactured goods soon on ‘e-marketplace’, Inspector General of Prisons and Correctional Services Amitabh Gupta

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…