Yerwada Mental Hospital | येरवडा मनोरुग्णालयात पुन्हा एका रुग्णाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात (Yerwada Mental Hospital) एका रुग्णाने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूरज राजेंद्र कांबळे (वय-25) असे आत्महत्या केलेल्या मनोरुग्णाचे नाव आहे. सूरज कांबळे याने पँट फाडून दोर तयार केला. दोर खिडकीच्या गजाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Yerwada Mental Hospital)

सूरज कांबळे हा मानसिक विकाराने ग्रस्त होता. त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि.19) त्याने पँट फाडून दोर तयार केला. दोर खिडकीच्या गजाला बांधला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Yerwada Mental Hospital)

आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषीत केले. या घटनेची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे. येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. येरवडा मनोरुग्णालयात मनोरुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल

Ajit Pawar Group Reply Nitesh Rane | ‘नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही व्यक्तीगत टीका झाली’,
नितेश राणेंना अजित पवार गटाचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)