एटीएम वर दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांकडून २६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येरवडा परिसरात घरफोड्या करणाऱ्या आणि एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत दरोडेखोरांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्याकडूनसुरजीतसिंग राजपालसिंग टाक (वय २०, रा. बिराजदार नगर, हडपसर) व गोगलसिंग शामसिंग कल्याणी (वय ४७ वर्षे, रा. रामटेकडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर दुसऱ्या दिवशी लागलीच बिंतूसिंग शामसिंग कल्याणी (वय २३, रा. कोठारी व्हिला व एक अल्पवयीन मुलगा अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, य़ेरवडा पोलिसांचे तपास पथक गस्त घालत होते. त्यावेळी काही जण येरवजा येथील एका एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तय़ारीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी येरवडा येथील आंबेडकर सांस्कृतिक हॉलच्या समोर सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. तर इतर तिघांनी पोबारा केला. त्यानंतर पोलिसांनी इतर दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसानी एक अल्टो कार, एक दुचाकी लोखंडी सुरे, पेपर स्प्रे, कटावणी, स्क्रू ड्रायवर, असे साहित्य जप्त केले.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहरात इतरत्र दरोडे, घरफोड्या, आणि चोऱ्यांचे गुन्हे केले आहेत.

त्यांच्यावर यापुर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण च्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर त्यांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन चारचाकी चालकांना गाड्या चोरून नेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ४ चारचाकी वाहने, ५ दुचाकी आणि १०० ग्रॅम सोन्याचे तर ३०० ग्रॅम चांदीचे दागिने, एक सिम्फनी कंपनीचा कुलर, ३ लोखंडी कोयते, मिरची पुड, स्क्रू ड्रायव्हर, पेपर स्प्रे असा २६ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आय़ुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’