क्राईम स्टोरीताज्या बातम्या

Yes Bank Case | नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

नवी दिल्ली : Yes Bank Case | 300 कोटी रुपयांच्या फसवणूक (Yes Bank Case) प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Delhi Police Crime Branch) प्रसिद्ध लॉबिस्ट नीरा राडिया ( corporate lobbyist nira radia) यांना चौकशीसाठी समन्स (summons) पाठवले आहे. या प्रकरणी अटक केलेले 3 आरोपी यतीश वहाल (Yateesh Wahaal) , सतीशकुमार नरुला (Satish Kumar Narula) आणि राहुल सिंह यादव (Rahul Singh Yadav) यांची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना नीरा राडिया यांचे नाव (Yes Bank Case ) समोर आले.

राजीव कुमार नावाच्या व्यक्तीने केली होती तक्रार

राजीव कुमार नावाच्या व्यक्तीने नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (naarayani investment private limited) आणि त्याची सहकंपनी नयाती हेल्थ केअर अँड रिसर्च एनसीआर प्रायव्हेट लिमिटेड (nayati health care and research ncr private limited) आणि कंपनीचे संचालक नीरा राडिया (Director Neera Radia), त्यांची बहिण करुणा मेनन (Karuna Menon), यतीश वहाल, सतीशकुमार नरुला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. के. सिंह (crime branch addl cp raj kumar singh) यांनी दिली.

गुरुग्राममध्ये उभारणार होते रूग्णालय

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, या कंपन्यांचे कार्यालय खानपूर भागात असून कंपन्यांचे नाव यापूर्वी OSL हेल्थकेअर (OSL Healthcare) होते. गुरुग्राममध्ये (Gurugram) एक रुग्णालय उभारण्याचा त्यांचा बेत होता. या प्रकल्पात तक्रारदाराचे 49 टक्के शेअर होते तर 51 टक्के शेअर या कंपन्यांशी संबंधित मिश्रा आणि चंदन मिश्रा (Chandan Mishra) यांचे होते.

तक्रारदाराला ठरवली होती मासिक 30 लाख फी

दोघांमध्ये विम्हास नावाचे रुग्णालय सुरु करण्यासाठी करार झाला होता. तक्रारदाराला आश्वासन देण्यात आले होते की, प्रत्येक महिन्याला त्याची प्रोफेशनल फी म्हणून 30 लाख रुपये दिले जातील. रुग्णालयाच्या निर्मितीदरम्यान OSL हेल्थकेअरच्या लोकांनी पैशांच्या कमतरतेचा हवाला देताना आपले 51 टक्के शेअर नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ला विकून टाकले.

तक्रारदाराला बाजूला केले

ही कंपनी नयाती हेल्थकेअर अँड रिसर्च प्रा. लि. शी संबंधीत होती. डील 99 कोटी रुपयांमध्ये झाली होती. परंतु नंतर कंपनीचे लोक सर्व निर्णय स्वतःच घेऊ लागले. शिवाय रुग्णालयाच्या उभारणीसाठी येस बँकेकडून (Yes Bank Case) 312 कोटी रुपयांचे कर्ज (Yes Bank Loan) घेतले होते. परंतू या पैशांचा वापर रुग्णालयाच्या कामासाठी केला नाही.

तक्रारदाराचे शेयर 49 वरून केले थेट 6 टक्के

पोलीस अधिकार्‍यांनी म्हटले की, तक्रारदाराची प्रोफेशनल फी 15 कोटी 28 लाख रुपये होती ती देखील दिली नाही. शिवाय त्याचे शेअर 49 टक्क्यांवरून थेट 6 टक्के केले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रा. लि., नयाती हेल्थकेअर अँड रिसर्चची होल्डिंग कंपनी असून त्याचे 93 टक्के शेअर त्यांचेच आहेत.

या कंपनीची मुख्य प्रमोटर नीरा राडिया असल्याचे आढळून आले.
कंपनीने 312 कोटींचे कर्ज घेऊन त्यापैकी 208 कोटी रुपये अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यात वर्ग (Yes Bank Case) केले.

छापेमारीनंतर 3 आरोपींना अटक

चौकशीत उघड झाले की, हे खाते राहुल सिंह यादव नावाच्या व्यक्तीने पैसे हडप करण्यासाठी उघडले होते.
यतीश वहाल आणि एस. के. नरुला, अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधीत होते.
पोलिसांनी 14 ऑक्टोबर रोजी केलेल्या छापेमारीनंतर तीन आरोपींना अटक केली आहे.
तसेच नीरा राडिया आणि त्याची बहिण करुणा मेनन यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

हे देखील वाचा

Pune News | ‘फडणवीस खड्डा’, ‘चंपा खड्डा’, ‘महापौर खड्डा’; पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांचे नामकरण, शिवसेनेने केले अनोखे आंदोलन (व्हिडीओ)

7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Yes Bank Case | delhi police crime branch summons corporate lobbyist niira radia yes bank loan gurgaon gurugram hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Back to top button