YES बँकेच्या प्रकरणात वाढू शकते प्रियंका गांधींंची ‘अडचण’, राणा कपूरनं 2 कोटींमध्ये खरेदी केल्या होत्या प्रियंकाच्या 44 पेंटिंग, ED चा तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सातत्याने आपला तपास करत आहे. अंमलबजावणी संचालनालय आता या प्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याशिवाय प्रियंका गांधी यांचीही चौकशी करू शकते. येस बँकेवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणारा काँग्रेस पक्ष आता प्रियंका गांधी आणि बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यातील व्यवहाराचे स्पष्टीकरण देत आहे. तर, भाजपाने यावरून म्हटले आहे की, भारतात प्रत्येक आर्थिक घोटाळा गांधी कुटुंबाशी जोडलेला असतो.

राणा कपूर यांच्या अटकेनंतर ही माहिती समोर आली आहे की, काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्या पेंटिंग्स राणा कपूर यांनी 2 करोड रूपयांना खरेदी केल्या होत्या. शनिवारी ईडीच्या छाप्यानंतर राणा कपूर यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी भाजपाने राणा कपूर यांच्यासोबत पी. चिदंबरम यांचा फोटो दाखवत काँग्रेस पक्षाला घेरले होते. यूपीए सरकारच्या काळात प्रियंका गांधी यांच्या पेंटिंग्स राणा कपूरने 2 करोड रुपयांना खरेदी केल्या होत्या. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सुद्धा या प्रकरणाचा तपास करत आहे.

राणा कपूर 11 मार्चपर्यंत ईडीच्या कस्टडीत
ईडीने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सुमारे 30 तास चौकशी केल्यानंतर अटक केली. 11 मार्चपर्यंत ते ईडीच्या ताब्यात राहणार आहेत. यासोबतच ईडीने म्हटले आहे की, रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता आरोपीला कोर्टात सादर करण्यात येईल.

ईडीने शनिवारी राणा कपूर यांच्या निवासस्थानी तपास केला. राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन व्हेंचर्सला घोटाळेबाजांकडून 600 करोड रुपये मिळाले होते का, याचा तपास ईडी सध्या करत आहे.

याशिवाय, अधिकार्‍यांनी सांगितले की, कपूर यांना शनिवारी दुपारी बॅलार्ड इस्टेट येथील एजन्सीच्या कार्यालयात आणले होते. शुक्रवारी रात्री समुद्र महल परिसरातील राणा यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. यावेळी त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले होते.

येस बँकेच्या ग्राहकांसाठी थोडी दिलासादायक खबर
याशिवाय संकटाचा सामना करणार्‍या येस बँकेच्या ग्राहकांना थोडी दिलासादायक खबर आहे. आता येस बँकेचे डेबिट कार्ड होल्डर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतील. याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ग्राहकांना बँकेच्या शाखेतून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांग लावावी लागत होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like