कोण आहेत प्रशांत कुमार, ज्यांना संकटात अडकलेल्या YES बँकेला संभाळण्याची दिली गेली ‘जिम्मेदारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील प्रसिद्ध ‘येस बँक’ वाईट टप्प्यातून जात आहे. बँक कर्जात आहेच तसेच आरबीआयच्या निर्बंधांचा सामनाही बँकेला करावा लागत आहे. याशिवाय येस बँकेच्या बोर्ड देखील आरबीआयने बरखास्त केले आहे. तथापि, आरबीआयच्या वतीने प्रशांत कुमार यांची येस बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया प्रशांत कुमार कोण आहेत.

कोण आहेत प्रशांत कुमार ?
प्रशांत कुमार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) माजी मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) आहेत. लिंक्‍डइन प्रोफाइलनुसार प्रशांत कुमार हे सुमारे 36 वर्षे एसबीआयमध्ये कार्यरत आहेत. यावेळी त्यांनी कोलकाता आणि मुंबई मंडळात काम केले आहे. प्रशांत कुमार यांना एचआर, अ‍ॅडमिनिस्‍ट्रेशन आणि बँकिंगचा प्रचंड अनुभव आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ते विज्ञान आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत. याशिवाय प्रशांतकुमार यांचे प्रारंभिक शिक्षण बिहारची राजधानी पटना येथे झालेआहे.

बँकेवर आरबीआयचे निर्बंध
गुरुवारी रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर 3 एप्रिलपर्यंत निर्बंध घातले आहे. या कालावधीत येस बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातून केवळ 50 हजार रुपये काढू शकतील. तथापि, आपत्कालीन परिस्थितीत अटींसह 5 लाख रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. याशिवाय येस बँक कोणतीही नवीन कर्ज वाटप करू शकणार नाही किंवा गुंतवणूकही करू शकणार नाही.

या बातमीनंतर येस बँकेचा शेअर शुक्रवारी इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर आला. सुरुवातीच्या व्यापारात बँकेचा शेअर 5.15 रुपये होता, जो नंतर 15 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, रोखीच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या येस बँकेत गुंतवणूक करण्यास एसबीआय बोर्डाने ‘तत्वत: मान्यता’ दिली आहे.