YES बँकेच्या खातेदारांना अर्थमंत्र्यांकडून मोठा ‘दिलासा’, म्हणाल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने खासगी क्षेत्रातील येस बॅंकेवर जसे 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा लावली, यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला. देशातील अनेक शहरात बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेदारांच्या रांगा लागल्या आहेत. शुक्रवारी परिस्थिती आहे की मुंबई आणि अहमदाबादमध्ये येस बँकेचे ग्राहक त्रस्त झाल्याचे दिसले. बँक ग्राहकांनी सकाळपासून एटीएमबाहेर रांगा लावल्या परंतु काही एटीएम रिकामे होते. त्यानंतर लोक गोंधळ घालू लागले त्यामुळे एटीएमबाहेर पोलिसांना तैनात करण्यात आले.

अर्थ मंत्र्यांचे आश्वासन – पैसे सुरक्षित
येस बँकेवर संकट आल्यानंतर केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी खातेदारांना दिलासा दिला की त्यांचे पैसे डुबणार नाहीत. बँक खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. खातेदारांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. रिझर्व बँकेचे अधिकारी समस्यावर समाधान काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे निर्मला सितारामन यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून स्थितीवर नजर ठेवून आहोत. आरबीआयने अनेक पावले उचलली आहेत, परंतु यावर अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नव्हती, परंतु आता या उपायांवर पावले उचलली जात आहेत. एटीएममधून कॅश काढण्याची मर्यादा निश्चित केल्यानंतर निर्मला सीतारामन म्हणाल्या की आरोग्य, विवाह आणि अन्य आपातकालीन मुद्यांसाठी अतिरिक्त रक्कम काढता यावी यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

येस बँक प्रकरणी एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली आणि सांगितले की घाबरुन जाण्याचे कारण नाही, आम्ही सिस्टम तयार करत आहोत. ग्राहकांनी जमा केलेले पैसे सुरक्षित आहेत.

बँकेला वेळ द्यायला हवा – आरबीआय गव्हर्नर –
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आम्ही 30 दिवसाची मर्यादा निश्चित केली आहे. आरबीआय येस बँकेला संकटातून वेगाने बाहेर काढेल. ते म्हणाले की तुम्हाला बँकेला वेळ द्यावा लागेल, काही पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. ते प्रयत्न करत आहेत. जेव्हा आम्हाला कळाले की हे प्रयत्न पुरेसे नाही तेव्हा आरबीआयने यात हस्तक्षेप केला.