काय सांगता ! होय, राणा कपूरच्या मुली इंडिया बुलमध्ये चालवत होत्या ‘प्रायव्हेट क्लब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुलीही व्यावसायिकरित्या खूप सक्रिय आहेत. राणा यांच्या तिन्ही मुलींनी मुंबईतील इंडिया बुल या इमारतीत खासगी क्लब उघडला आहे, ज्यामध्ये फक्त उद्योगपतींनाच सदस्य बनवले जाते. आता ईडीमार्फत याची चौकशी करण्यात येत आहे.

आता एकएक करून राणा कपूरच्या अटकेनंतर येस बँक घोटाळ्याचे दुवे समोर येत आहेत. त्यांच्या मुली रोशनी, राखी आणि राधा यांची कंपनी ‘दि थ्री सिस्टर इन्स्टिट्यूशनल’ ने इंडिया बुल इमारतीच्या १५ व्या मजल्यावर ‘दि ए’ नावाचा एक खासगी क्लब उघडला होता.

सन २०१८ पासून सुरु करण्यात आलेल्या या क्लबमध्ये लोकांना गुंतवणूकीसाठी आमंत्रित केले जात होते आणि उद्योजकांना सदस्यत्व देण्यात येत होते. आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती गोळा केली जात आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती घेतली जात आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा कपूरची पत्नी बिंदू कपूर आणि मुलगी रोशनी कपूर यांचीही चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने बिंदू आणि रोशनी यांची रविवारी रात्री दहा वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत म्हणजेच एक वाजेपर्यंत चौकशी केली. या चौकशीत रोशनीला ब्रिटिश एअरवेजवरून लंडनला का जायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. रविवारी रोशनी कपूरला लंडनला जायचे होते, परंतु विमानतळावर तिला थांबविण्यात आले.