Yes Bank घोटाळ्या प्रकरणी अनिल अंबानींची ED कडून कसून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – येस बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अनिल अंबानी यांची कसून चौकशी केली. अनिल अंबानी हे रिलायन्स समूहाचे प्रमुख आहेत. अनिल अंबानींची ईडीकडून सलग सात तास रात्री उशिरा पर्यंत चौकशी सुरु होती. अनिल अंबानीं समूहातील विविध ९ कंपन्यांना १२ हजार ८०० कोटी थकीत कर्जाबद्दल त्यांचा जवाब नोंदविण्यात आला. चौकशी पूर्ण नाही झाली तर, परत गुरुवारी चौकशी केल्यावर कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. बँकेचे सहव्यवस्थापक राणा कपूर यांची कोठडी ची मुदत संपत आल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एस्सेल समूहाचे आणि झी समूहाचे माजी अध्यक्ष सुभाष चन्द्र यांना शुक्रवारी चौकशीला बोलविण्यात येणार आहे.

अनिल अंबानी ह्यांना सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस दिली होती पण, त्यांची तब्येत अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी दोन दिवसांची मुदत वाढ मागितली होती. मुदतवाढ दिल्यानंतर गुरुवारी अंबानी हे ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. तपशीलवार माहिती घेऊन ईडीने अनिल अंबानी यांचा जवाब नोंदवून घेतला आहे. सर्व कागदपत्रे नीट तपासून मगच त्यांचा जवाब नोंदवण्यात आलेला आहे.

येस बँकेत जो घोटाळा झाला त्यासाठी, राणा कपूर च जवाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक उद्योगसमूह आणि कंपन्यांना ३ हजार कोटींचे कर्ज वाटप केले होते. कर्ज देत असताना मोठ्या प्रमाणात लाच घेऊन ती रक्कम आपल्या मुलीच्या नावावर परदेशी बँकेत वळवल्याची माहिती ईडी आणि सीबीआय च्या तपासात समोर आले आहे. राणा कपूर यांनी रिलायन्स,एस्सेल ग्रुप आणि डीएचएफएल व व्होडाफोन या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिली आहेत. राणा कपूर यांची पत्नी बिंदू आणि त्यांच्या तीन मुलींची सुद्धा चौकशी होऊ शकते.