कामाची गोष्ट ! कुठल्याही कागदपत्रांशिवाय घरबसल्या ‘ही’ बँक देणार काही मिनीटांमध्ये Loan, सुरू केलीयं ‘ही’ खास सुविधा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील खासगी क्षेत्राच्या (Private Sector) येस बँकेने (Yes Bank) ‘लोन इन सेकेंड्स’ (Loan in Seconds) ची सुरुवात केली आहे. याद्वारे बँकेच्या पूर्व-मंजूर दायित्व ग्राहकांना (pre-approved liability customers) त्वरित किरकोळ कर्ज मिळेल. या डिजिटल उपक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे ग्राहकांना बँक शाखेत न जाता कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत करण्यासाठी अडथळा मुक्त त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हे आहे.

एका अधिकृत निवेदनानुसार, या नवीन योजनेतील चांगली गोष्ट म्हणजे ग्राहकांना या कर्जासाठी बँकेत येण्याची गरज भासणार नाही, ते नेट बँकिंगद्वारे अर्ज करू शकतात. कोरोना संकटाच्या (Covid-19) दरम्यान येस बँकच्या ग्राहकांना ही योजना मोठ्या प्रमाणात दिलासा देणार आहे. कोरोना कालावधीत लोकांना होणार्‍या आर्थिक अडचणी लक्षात घेता येस बँकेने ही सुविधा सुरू केली आहे.

कर्जाची रक्कम त्वरित दिली जाईल

‘लोन इन सेकेंड्स’साठी येस बँकेच्या पात्र ग्राहकांना बँकेच्या वतीनेच संपर्क साधला जाईल. त्वरित कर्जासाठी अर्ज करण्याची लिंक त्यांना पाठविलेल्या ईमेल किंवा संदेशात राहील. ग्राहकांना अंतिम ऑफर व्हेरिफाय करून स्वीकार करावी लागेल, त्यानंतर कर्जाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात येईल. बँकेच्या मते, या योजनेंतर्गत कर्जाच्या अर्जाचे मूल्यांकन रिअल टाइममध्ये केले जाते. यामुळे दस्तऐवजीकरणाची प्रदीर्घ प्रक्रिया होत नाही आणि ग्राहकास त्वरित कर्ज मिळते. या फीचरच्या मदतीने ग्राहकाला बँकेच्या शाखेत न जाता आणि कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांशिवाय ऑनलाइन तपासणीनंतर त्वरित कर्ज दिले जाते.

येस बँकेच्या रिटेल बँकिंगचे ग्लोबल हेड राजन पटेल म्हणाले की, ग्राहकांना सोयीस्कर पद्धतीने विविध प्रकारच्या किरकोळ उत्पादनांची उपलब्धता देणे हे या प्रस्तावाचे उद्दीष्ट आहे. लोन इन सेकेंड्सने आम्ही ग्राहकांना एक वेगळा बँकिंग अनुभव देऊ. कर्जाची रक्कम त्वरित पूर्णपणे पेपरलेस आणि कोणत्याही अडथळ्याविना त्यांच्या खात्यावर पोहोचेल.

लोन इन सेकेंड्सनुसार असे मिळू शकेल कर्ज

– लोन इन सेकेंड्स अंतर्गत जे ग्राहक कर्ज घेण्यास पात्र असतील त्यांना येस बँकेतर्फेच संपर्क साधला जाईल.

– त्वरित कर्जासाठी अर्ज करण्यासाठी एक लिंक बँकेने त्यांना पाठविलेल्या ईमेल किंवा संदेशामध्ये उपलब्ध असेल.

– ग्राहकांना अंतिम ऑफर व्हेरिफाय करणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे, त्यानंतर कर्जाच्या विनंतीला ऑथेंटिकेट करावे लागेल. यानंतर कर्जाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात येईल. यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत किंवा शाखेत जाण्याची गरज भासणार नाही.