एकेकाळी IPL ची ‘मिस्ट्री गर्ल’ होती राणा कपूरची मुलगी, आज चौकशीच्या फेर्‍यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची 15 तास चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने त्यांना अटक केली आहे. राणा कपूर यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) च्या कलामांतर्गत अटक करण्यात आली आहे. राणा कपूर, पत्नी बिंदू आणि तीन मुली राखी कपूर टंडन, रोशनी कपूर, राधा कपूर सुद्धा काही कंपन्यांशी संबंधीत आहेत, ज्यांना संशयास्पद काही रक्कम पाठवण्यात आली आहे.

राणा कपूरची एक मुलगी तर आयपीएलमध्ये मिस्ट्री गर्ल सुद्धा होती. त्यांच्या या मुलीचे उठणे-बसणे मोठमोठ्या लोकांसोबत होते. परंतु, आता ही मुलगी ईडीच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकली आहे. 2015 मध्ये झालेली आयपीएल फायनल मॅच संपल्यानंतर एक चेहरा खुप चर्चेत आला होता. हा चेहरा होता राखी कपूर टंडनचा. येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची मुलगी राखी मॅचनंतर प्रेझंटेशनमध्ये दिसली होती. यानंतर ती ट्विटर आणि फेसबुकवर झळकत होती.

त्यावेळी ट्विटर आणि फेसबुकवर आयपीएलसोबतच राखी कपूर टंडनसुद्धा सतत ट्रेंड करत होती. सुंदर आणि श्रीमंत असूनही ती मीडियापासून दूर होती. परंतु, आयपीएल फायनल मॅचनंतरच्या प्रेझंटेशननंतर ती ट्विटरवर प्रसिद्धीच्या झोतात आली. ज्यांनी राखीला मुंबई इंडियनच्या जर्सीमध्ये पाहिले, त्यांना तिच्या बद्दल खुप उत्सुकता होती. सर्वांनी तिच्याबद्दल फेसबुक आणि ट्विटरवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राखी कपूर टंडन येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची दुसरी मुलगी आहे. तिच्या आईचे नाव बिंदू कपूर आहे. दोन बहिणी राधा आणि रोशनी आहेत. ती 33 वर्षांची असून विवाहित आहे.

राखी कपूर टंडन येस बँकेसाठी ब्रँड मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटजीसुद्धा पाहात होती. राखीने दिल्लीचे उद्योगपती अलकेश टंडन यांच्याशी विवाह केला आहे, ज्यांचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्याशी नाते आहे. तिने अमेरिकेत इन्व्हेस्टमेन्ट बँकरची सुद्धा नोकरी केली आहे. मॅचनंतर झालेल्या पार्टीत राखी मुंबई इंडियन्सचा खेळाडू कीरोन पोलार्डसोबत दिसली होती. राखी टंडनने व्हार्टन स्कूल, यूनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हेनियामधून एमबीए केले आहे. ती ग्रेज्युएशनमधील त्या तीन विद्यार्थ्यांपैकी एक होती, ज्यांना थेट एमबीएसाठी निवडण्यात आले होते. वडील येस बँकेचे सीईओ झाल्यानंतर ती त्यांच्या उत्तराधिकारी सारखीच होती. तरीसुद्धा ती स्व:ताचा व्यवसाय करणे पसंत करते. 2013 मध्ये तिच्या विवाहात लक्ष्मी मित्तल आणि बोरिस बेकरसह नीता आणि टीना अंबानी सुद्धा सहभागी झाल्या होत्या. राखी आणि अलकेश इंग्लंडमध्ये एका सुट्टीच्या दरम्यान भेटले होते.