भारत पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल : पंतप्रधानांचा विश्वास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीनंतर भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणार्‍यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते सीआयआयला 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते.

कोरोनामुळे देशाच्या विकासाचा वेग कितीही धीमा झाला असला तरी, भारताने लॉकडाउनला मागे सोडून अनलॉक फेज 1 मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा हिस्सा सुरु झाला आहे. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जगात कोरोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली असे मोदी यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असेही ते म्हणाले.

देशातील जनता, कोरोना योद्धे यांनी एकत्रिात लढा देउन काम केल्यामुळे आपण निश्चीतच पुढे जाणार आहोत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like