…तरीही तुम्ही फेकूच ; उपसरपंचाच्या ‘त्या’ FB लाईव्हनंतर मनसेचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आता हरीसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेसबुक लाईव्ह करा किंवा हरिसाल मध्ये सोन्याची घरं बांधा. तरी तुम्ही फेकूच आहात. असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे यांचा हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत हरिसालचे उपसरपंच यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. उपसरपंचाच्या त्या उत्तराला प्रत्युत्तर देतांना संदीप देशपांडे यांनी हे वक्तव्य केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभेच्या रिंगणात नसले तरी राज ठाकरे मोदींविरोधात राज्यभरात सभा घेत आहेत. दरम्यान, सोलापूर येथील आयोजित सभेत एक व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणारे हरिसाल गाव डिजिटल झाले नसल्याचा दावा केला होता. दरम्यान, हरिसाल येथील उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबुक लाईव्ह करून हा दावा खोडून टाकला आहे. आमच्या गावाविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारण करु नये. राज ठाकरे यांनी सभेत उभा केलेला मॉडेल तरुण आमच्या गावचा नागरिक नसल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही. असे त्यांनी म्हंटले होते.

दरम्यान, उपसरपंच गणेश येवले यांच्या फेसबुक लाईव्हला उत्तर देतांना, आता हरीसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेसबुक लाईव्ह करा किंवा पंतप्रधानांचं करा नाहीतर हरिसाल मध्ये सोन्याची घरं बांधा परंतु आता लोकांना पक्क समजले आहे की तुम्ही फेकू आहात. असे मनसे नेते संदीप देशपणे यांनी म्हंटले आहे.

Loading...
You might also like