Honey Singh New Song Out : हनी सिंग आणि नेहा कक्करचं नवीन गाणं रिलीज ! ‘हॉट’ अवतारात दिसली नुसरत भरूचा (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – रॅपर आणि सिंगर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) आणि सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) यांच्या सईयां जी या नवीन गाण्याची चाहते आतुरतेनं वाट पहात होते. अखेर हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस नुसरत भरूचा (Nushrat Bharucha) हिचा अत्यंत हॉट अंदाज गाण्यात पहायला मिळत आहे जो चाहत्यांना खूपच आवडला आहे. टी सीरिजच्या बॅनरअंडर तयार करण्यात आलेलं हे गाणं युट्युबवर रिलीज झालं आहे. या म्युझिक व्हिडीओनं रिलीज होताच धमाल केली आहे. काही तासातच गाण्यानं 30 लाखांहून अधिक व्ह्युज घेतले आहेत.

हनी सिंग, लिल गोलू, होमीनं लिहिले लिरीक्स

सध्या या गाण्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गाण्यात हनी सिंगचा वेगळाच अंदाज दिसत आहे. नुसरतचा बोल्ड अवतार सर्वांनाच खूप आवडला आहे. गाण्यात ती वेगवेगळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. मिहिर गुलाटीनं गाणं डायरेक्ट केलं आहे. गाण्याचे लिरीक्स हनी सिंग, लिल गोलू आणि होमी दिल्लीवालानं लिहिले आहेत.

हनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं नुकतंच तर छलांग सिनेमातील त्याचं गाणं केअर नी करदा सोशलवर तुफान व्हायरल झालं होतं. यात राजकुमार राव आणि नुसरत भरूचा दिसले होते. त्याचं फर्स्ट किस आणि जिंगल बेल ही गाणी सोशलवर चर्चेत असल्याचं दिसलं होतं.