LOCA Song : ‘रॅपर’ हनी सिंगचं नवं गाणं ‘रिलीज’, Youtube वर ‘धमाल’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रॅपर आणि सिंगर हनी सिंग याचं लोका(LOCA) हे नवीन गाणं आज(मंगळवारी दि 3 मार्च 2020) रिलीज झालं आहे. म्युझिक व्हिडीओ टी सीरीजच्या युट्युब चॅनलवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा हनी सिंग आपल्या ओळखल्या जाणाऱ्या अंदाजात समोर येताना दिसत आहे. कम्प्लीट रॅपर स्टाईलमध्ये यॉटवर मुलींच्या घोळक्यात हनी सिंग खूपच कूल दिसत आहे. गाणं रिलीज होताच या गाण्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर या गाण्याचे लिरीक्स लिटिल गोलू आणि हनी सिंगनं मिळून लिहिले आहेत. हनी सिंग पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षेवर खरा उतरला आहे. थोड्या कॅची फेज, थोड्या चीप लाईन्स आणि रिपीटेटीव वर्डसोबत खूप कमाल बीट्स आहेत. हनी सिंगनं स्वत: हे गाणं गायलं आहे. म्युझिक व्हिडीओचं प्रॉडक्शनही त्यानंच केलं आहे.

गेल्या काही वर्षात हनी सिंगनं वेट पुट ऑन केलं आहे. आपल्या मागच्या काही गाण्यांमध्ये त्याचा हाच अंदाज दिसत आहे. सध्या हनी सिंगचं हे नवीन गाणं युट्युबवर ट्रेंड करताना दिसत आहे.

लोक म्हणजे काय ?

लोका या शब्दाचा अर्थ स्पॅनिशमध्ये क्रेजी असा होतो. या गाण्याला मोठा प्रतिसाद आहे. तसंही तुम्ही हा शब्द अनेक गाण्यांमध्ये ऐकला आहे. काही लोकांनी तर कमेंटमध्येच हनी सिंगला सर्वांचा बाप म्हटलं आहे.