#YogaDay 2019 : वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – वय एकदा वाढत चालल कि, मान, पाठ, कंबर, गुडघे हे आजार तोंडवर काढतात. आणि आपले एकदा वय झाले कि, आपल्याला थोड्या वेदनाही असह्य होतात. काहीकाहींना तर वाढत्या वजनामुळे चलता येत नाही. त्यांना लगेच काठीचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या सर्व समस्यांना तोंड द्यायची गरज पडू नये. म्हणून वृद्ध व्यक्तींनीही योगा करणे खूप गरजेचे आहे. योगामुळे वृद्ध व्यक्तींच अखेरचं आयुष्य आनंदात जाऊ शकते. त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी नियमित योगा करणे गरजेचे आहे.

वयोवृद्धांनी योगा का करावा 

१) वय वाढल्यानंतर आरोग्याच्या समस्या वाढतात. वाढत वय आणि वजन यामुळे जेष्ठांमध्ये हृदयरोगाचा धोका जास्त असतो.

२) वय झाल्यानंतर पाठीचा कणा वाकायला लागतो. आणि मग चालता येत नाही. रोज नियमित योगा केला. तर ही समस्या उदभवणारं नाही.

३) वय झालेल्या व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा वाढतो. योगामुळे चिडचिडेपणा नियंत्रणात येतो.

४) नियमित व्यायाम केल्याने वयोवृद्धांमध्ये जी गुडघेदुखीची समस्या असते. ती नियंत्रणात येईल.

५) वयोवृद्ध व्यक्ती रोज व्यायाम केल्याने दिवसभर फ्रेश राहतात. योगामुळे आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे वुद्ध व्यक्तींनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

सिने जगत –

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’