Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Yoga Asanas For Neck Pain Relief | या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक झाल आहे. अनेक चुकीच्या सवयींमुळे अंगदुखी आणि तणावाच्या समस्या वाढल्या आहेत. काही परिस्थितीत यामुळे गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. यातील मानदुखीची समस्या (Neck Pain Problem) अशीच एक आहे. यामुळे बहुतांश लोक त्रस्त असतात (Benefits Of Yoga-Asanas). टीव्ही, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बराच वेळ बसण्याच्या सवयीमुळे ही समस्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. मान बराच काळ एकाच स्थितीत राहिल्यामुळे आखडते (Yoga Asanas For Neck Pain Relief).

 

मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्रास होऊ शकतो. काही जणांना ही वेदना पाठ आणि खांद्यापर्यंत जाणवते. योगासनांचा सराव करण्याची सवय तुम्हाला या समस्या दूर करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊयात.

 

शवासन (Shavasana) :
मानदुखीपासून बचाव करण्यासाठी शवासन हे अतिशय परिणामकारक आहे. यामुळे मानेचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. मजबूत स्नायू दीर्घकाळापर्यंत मानदुखी रोखण्यास मदत करतात. पोटावर झोपून छाती वर उचलण्याच्या स्थितीत मान आणि पाठीच्या कण्यावरचा दाब वाढतो, त्यामुळे या स्नायूंची क्रियाशीलता वाढते आणि ताण कमी होतो. मानदुखी आणि ताठरपणा दूर करण्यासाठी शवासन योगाचा सराव खूप फायदेशीर आहे.

 

नटराजासन योग (Natarajasana) :
नटराजासन (रिक्लिनिंग ट्विस्ट) या आसन, पाठीचा कणा ताणणे, स्नायूंचा ताण कमी करणे, मानदुखी दूर करणे आणि मन शांत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मानेसोबतच्या या योगामुळे तुमचे खांदे, पाठ, हात आणि पायही मजबूत होतात. हे आसन पाचन शक्ती वाढते.
या योगाचा सराव शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.

मार्जरी आसन (Marjariasana) :
मार्जरी आसनाचा सराव केल्यास मानेच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
साधारणत: हा योगाभ्यास पाठ आणि पोटासाठी फायदेशीर मानला जातो, पण या व्यायामादरम्यान मानही ताणली जाते.
मार्जरी आसनांचा नियमित अभ्यास केल्याने मानेचा ताण, कडकपणा आणि वेदना दूर होण्यास मदत होते.
हा व्यायामामुळे अवयवांमध्ये वेदना कमी होऊन लवचिकता येते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Yoga Asanas For Neck Pain Relief | yoga asanas for neck pain relief know what causes it and prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | रस्त्यात थुंकल्याने तलवारीने वार, स्वारगेटच्या गुलटेकडी परिसरातील 6 जणांना दहा वर्षे सक्तमजुरी

 

Triumph Career Academy Pune | पुण्यातील ‘ट्रायम्फ करिअर अ‍कॅडमी’मधील 53 जणांची पोलिस उपनिरीक्षकपदी (PSI) निवड; पहिल्या बॅचचा दिखामात सत्कार (व्हिडिओ)

 

Pune Municipal Corporation (PMC) | जंतनाशक दिन ! पुणे महानगरपालिका देणार शहरातील 4.5 लाख मुलांना मोफत जंतनाशक गोळ्या