Yoga Asanas For Respiratory System | शरीर निरोगी राहण्यासाठी श्वसनयंत्रणा मजबूत करा, ‘या’ योगासनांचा फायदा होईल; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीराच्या प्रत्येक अवयवाला योग्य प्रकारे काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची (Oxygen) आवश्यकता असते. यासाठी तुमची श्वसनसंस्था आणि त्याच्याशी संबंधित अवयव निरोगी राहणं अत्यंत गरजेचं आहे. श्वसनसंस्था मजबूत ठेवल्याने अनेक प्रकारच्या गंभीर समस्या टाळता येतात (Yoga Asanas For Respiratory System). यासाठी रोज योगासनांचा सराव करण्याची सवय लागली पाहिजे. योगासनांच्या नियमित सरावामुळे फुफ्फुस आणि हृदय निरोगी राहते. त्यामुळे ऑक्सिजन आणि ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत सहज पोहोचते (Yoga Asanas For Respiratory System).

 

फुफ्फुसांची क्षमता अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी योग-व्यायामाचा सराव केला जाऊ शकतो. याशिवाय दररोज योगा (Yoga) केल्याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही मजबूत राहतात. योगासने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवून श्वासोच्छ्वास सुधारतात. श्वसनसंस्थेसाठी दररोज काही व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. सविस्तर जाणून घेऊया (Yoga Asanas For Respiratory System).

 

मत्स्यासन योग करा (Matsyasana Yoga) :
हा योग प्रकार फुफ्फुस आणि हृदयासाठी खूप फायदेशीर योग मानला जातो. या योगाच्या सरावामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याबरोबरच रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत राहतो.

 

मत्स्यासन योग अनेक प्रकारचे श्वसन विकार दूर करून फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. दररोज मत्स्यासन योगाचा सराव करण्याची सवय लावा, हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

सुखासन योग (Sukhasana Yoga) :
संपूर्ण शरीराच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच रक्तप्रवाह व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी सुखासन योग हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे फुफ्फुसांचे स्नायू बळकट होतात तसेच श्वसनेंद्रियांचे आरोग्यही सुधारते.

 

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सुखासन योगाचा सराव केल्यास शरीराला जास्तीत जास्त लाभ सहज मिळू शकतात. सुखासन योगाचा नियमित सराव आपले वय वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहे, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

 

भुजंगासन (Bhujangasana Yoga) :
फुफ्फुसांच्या आरोग्यास चालना देण्यासाठी आणि त्याचे कार्य सुलभ करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
मन शांत करण्यासाठी आणि तणाव-चिंतासारख्या समस्या दूर करण्यासाठीही या योगाचा सराव खूप फायदेशीर मानला जातो.

भुजंगासन योगाच्या सरावादरम्यान, फुफ्फुसांचे स्नायू ताणले जातात.
मुळे ऑक्सिजनचा संचय अधिक चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो.
भुजंगासन योगाचा नियमित सराव करून तुम्ही तुमची श्वसनसंस्था मजबूत ठेवू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Yoga Asanas For Respiratory System | yoga asanas for respiratory system how to keep your lungs strong

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Latest Study | मृत व्यक्तीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते? अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयोगाने जगाला आश्चर्याचा धक्काच बसला

 

Blood Sugar Control Tips | ब्लड शुगर वाढल्यास अवश्य प्या हे पाणी, रूग्णांना होईल फायदा; जाणून घ्या

 

Asthma Symptoms | फुफ्फुसात जमा कफ काढतात ‘या’ 4 आयुर्वेदिक वनस्पती; सूज-श्वासाच्या कमतरतेपासून मिळतो आराम