‘धनुरासन’ केल्याने लठ्ठपणा सोबतच ‘या’ आजारांवरही मिळवता येते नियंत्रण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपण निरोगी आणि सुदृढ राहण्यसाठी नियमित योगासने करा. असे अनेकजण आपल्याला सांगतात आणि योगासने केल्याने आपल्याला खूप फायदाही होतो. परंतु, या सर्व आसनातील धनुरासन हे असे आसन आहे. की, ते केल्यामुळे आपला लठ्ठपणा तर कमी होतोच परंतु त्यासोबतच अनेक आजारांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे आपल्याला दररोज सर्व आसने करायला वेळ मिळाला नाही तरी तुम्ही फक्त धनुरासन करून आपले अनेक आजार नियंत्रणात आणू शकता. जाणून घेऊया धनुरासन करण्याचे फायदे आणि ते कसे करावे.

धनुरासन करण्याचे फायदे

१) धनुरासन केल्याने पित्ताच्या समस्या नष्ट होतात. पोटाची चरबी कमी होते आणि पोटाचे स्नायू बळकट होतात.

२) जननेंद्रियांना संजीवनी मिळते.

३) छाती, गळा आणि खांदे मोकळे होतात.

४) पाय आणि हातांचे स्नायू बळकट होतात.

५) पाठीची लवचिकता वाढते.

६) तणाव आणि आळस निघून जाण्यास उत्तम.

७) मासिक पाळीमधील अस्वस्थता आणि बद्धकोष्ठता दूर होते.

८) मूत्र रोगांवर उपयोगी.

धनुरासन कसे करावे

१) पायात थोडे अंतर ठेऊन पोटावर झोपा. हात शरीरालगत असू द्या.

२) गुडघ्यातून पाय घडी करून हाताने घोटे पकडा.

३) श्वास घेत जमिनीपासून छाती वर उचला आणि पाय वर आणि मागे ढकला.

४) चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत सरळ पुढे पहा. शरीरातील ताण वाढेल तसे हास्य देखील वाढू द्या.

५) श्वासावर लक्ष ठेऊन अंतिम स्थितीमध्ये स्थिर रहा. तुमचे शरीर धनुष्याप्रमाणे ताठ बनले आहे.

६) या स्थितीमध्ये विश्राम करत खोल दीर्घ श्वास घेत रहा.

७) १५-२० सेकंदानंतर श्वास सोडत पाय आणि छाती जमिनीवर आणा. घोटे सोडून विश्राम करा.

आरोग्यविषयक वृत्त