महिलांनो PCOD ची समस्या आणि मासिक पाळीत वेदना होत असतील तर घरीच करा ‘ही’ सोपी योगासनं ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन – नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ अँड रिसर्चनुसार देशात सुमारे 10 टक्के महिलांना पीसीओडीचा त्रास असतो. ही समस्या वेगानं वाढताना दिसत आहे. शरीरातील हार्मोनल इम्बॅलंसिंगमुळं शरीरावर केसही मोठ्या प्रमाणात येत असतात.

काय आहे PCOD समस्या ?

तसं तर याचं ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तज्ञ सांगतात की, जास्त ताण-तणाव, रात्री उशीरापर्यंत जागणं, स्मोकिंग, ड्रिकिंग यामुळं ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते. कारण यामुळं शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. काहींना अनुवंशिकपणेही याचा त्रास होतो.

या महिलांना उद्भवतो जास्त त्रास

तज्ञांच्या मते, ज्या महिला नाईट शिफ्ट, उशीरा जेवण करतात त्यांना या जीवनशैलीचा जास्त त्रास होतो आणि ही सम्स्या उद्भवते. पूर्वी केवळ वय जास्त असणाऱ्या महिलांनाच ही समस्या येत होती. परंतु आता मात्र 15-16 वयाच्या मुलींमध्येही ही समस्या दिसते.

काय होतो त्रास ?

या समस्येमुळं चेहरा आणि शरीरावर दाट केसही येतात. मासिक पाळीत जास्त वेदना होतात. रक्तस्राव जास्त होतो. यामुळं गर्भधारणेसाठी त्रास होण्याची शक्यता यामुळं खूप विकनेस जाणवतो आणि वजनही वेगानं वाढतं.

PCOD वर उपाय – योगा

योगाच्या मदतीनं ही समस्या कमी करता येते. कारण योगामुळं मेंटल आणि फिजिकल टॉक्सिन्स दूर होण्यास मदत होते. यासठी तुम्ही उष्ट्रासन, बटरफ्लाय, मार्जरासन म्हणजेच कॅट पोज आणि सूर्य नमस्कार करू शकता.

1) बटरफ्लाय आसन – यामुळं बॉडी पार्टच्या नर्व्स लूज होतात. प्युबिक एरियात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं.

2) सूर्य नमस्कार – हा एक असा व्यायाम आहे जो सर्व व्यायामाचा लाभ देतो आणि तुम्ही फिट राहता. यात 12 आसनं येतात. यामुळं सेक्शुअल हेल्थसाठीही फायदा होतो.