Yoga For Arthritis Patients | सांध्यातील वेदना-दाह कमी करण्यासाठी ‘हे’ व्यायाम प्रभावी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Yoga For Arthritis Patients | सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील तरुण वयातही सांधेदुखीसारखा (Arthritis) आजार होऊ लागला आहे. गुडघा किंवा सांध्यांमधील कूर्चा ऊतींचे सामान्य प्रमाण कमी होते. या अवस्थेमुळे, हाडांचे सांधे, विशेषत: गुडघ्यांमध्ये, तीव्र वेदना, सूज आणि कडकपणा जाणवू शकतो. सांधेदुखीची समस्या (Arthritis Problem) ही एक दशकापूर्वीपर्यंत वृद्ध व्यक्तींचा आजार म्हणून ओळखली जात होती. आता गेल्या काही वर्षांत ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही या समस्येने ग्रासले आहे (Yoga For Arthritis Patients).

 

सांध्यातील वेदना आणि सूज येण्यामुळे चालण्यास आणि उठण्यात अडचणी येतात. त्यामुळे दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करणे देखील कठीण होऊन बसते. सांध्यातील वेदना आणि सूज या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी योगासनांचा समावेश दिनचर्येत अवश्य करा. बर्‍याच प्रकारची योगासने ही व्यायामाबरोबर शरीराची क्रियाशक्ती वाढविण्यासह वेदना आणि सूज दूर करण्यास मदत करतात. अशाच काही योगाभ्यासांविषयी जाणून घेऊयात (Yoga For Arthritis Patients).

 

वीरभद्रासन योग (Virabhadrasana Yoga) –
वीरभद्रासन योगाच्या सरावाचा तुम्हाला हात, पाय आणि कंबर मजबूत करण्यासाठी आणि सांध्यातील समस्या कमी करण्यासाठी विशेष फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना संधिवात किंवा खांदा आखडण्याची समस्या आहे. त्यांना या योगाभ्यासाने आराम मिळू शकतो. याने रक्ताभिसरणही वाढते आणि स्नायूंना आराम मिळतो.

 

वृक्षासन योगा (Vrikshasana Yoga) –
हे आसन शारीरिक मुद्रा आणि सुसंवाद सुधारण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. या योगामुळे तुमचे पाय आणि पाठ मजबूत होते. हे योगासन पाय ताणण्याबरोबरच अस्थिबंधन आणि कंडरा मजबूत करण्यास मदत करू शकते. या योगाच्या नियमित सरावाने सांधेदुखीची लक्षणे दूर झालेली आढळले आहे.

सेतुबंधासन योग (Setu Bandhasana Yoga) –
यामुळे पाठीचे स्नायू, छाती, मान आणि पाठीचा कणा ताणण्यासाठी उपयोगी आहे.
ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांसाठी हे आसन खुप फायदेशीर मानले गेले आहे.
तसेच पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत होते.
कंबरेत आणि शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी हा योग रोजच करावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Yoga For Arthritis Patients | yoga for arthritis patients tips to avoid joint pain and stiffness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Esha Gupta Bedroom Photo | अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची होतीये सर्वत्र चर्चा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, जाणून घ्या कारण

 

Black And Green Grapes | काळे की हिरवे, कोणती द्राक्षे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ