Yoga for Skin : ‘हेल्दी’ आणि ‘ग्लोईंग स्किन’ मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ 3 योगासनं

सुंदर त्वचा प्रत्येकाल हवी असते. स्वच्छ त्वचेचे कौतूक प्रत्येकजण करतो. तुम्ही तुमच्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी दररोज काही ना काही केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरत असणार. या प्रॉडक्टचे साईड इफेक्ट तर होतात, शिवाय पैसेही जास्त खर्च होतात. फरक सुद्धा जास्त नजरेत येत नाही. मग अशावेळी तुम्ही सोपी योगासनं का करत नाही. होय योग केल्याने स्कीन हेल्दी होते, शिवाय तिची चमक वाढते. चेहरा किंवा स्कीनला निरोगी, ग्लोईंग आणि आकर्षक बनवणारी ही कोणती योगासनं आहेत ते जाणून घेवूयात.

1 ब्रिथींग एक्सरसाइज
हेल्दी आणि ग्लोईंग त्वचा तुम्ही ब्रिथींग एक्सरसाइजने सुद्धा बनवू शकता. यामध्ये वेगाने श्वास आत घ्यायचा आणि आणि काही सेकंद थांबून पुन्हा सोडून द्यायचा आहे. हा व्यायाम नियमित केल्यास हृदय निरोगी राहते. मेंदूला उर्जा मिळते. त्वचा सुंदर, टाइट आणि तनाव मुक्त दिसते. डोळ्याखालील काळी वर्तुळं सुद्धा दूर होतात.

2 हलासन
सर्वप्रथम जमीनीवर झोपा. पाय हळूहळू वर उचला आणि मानेच्या मागे नेण्याचा प्रयत्न करा. हातांनी कमरेला आधार द्या. या स्थितीत सुरूवातीला एक मिनिट राहू शकता नंतर वाढवून 5-10 मिनिट करू शकता. आता हळूहळू पूर्वस्थितीत या. बॅलन्स सांभाळा.

3 शीर्षासन
सर्वप्रथम मॅटवर बसा. आपल्या दोन्ही हातांच्या बोटांना इन्टरलॉक करून डोक्याच्या वर ठेवा. आता बोटांवर सर्व शरीराचा भार देत पाय हळूहळू वरच्या दिशेने उचलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा पाय हवेत वर जातील तेव्हा ते अगदी सरळ ठेवा. यामध्ये शरीराचा सर्व भार बोटे आणि डोक्यावर येईल. या स्थितीत काही वेळा थांबा नंतर हळूहळू गुडघ्यांना दुमडून पाय खाली आणा. आपल्या क्षमतेनुसार हे करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like