Yoga Guru Ramdev Baba | “भावना दुखावल्या गेल्याची खंत”; ठाण्यातील विधानावर रामदेव बाबांनी मागितली माफी

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) यांचा शुक्रवारी 25 नोव्हेंबर ठाण्यात कार्यक्रम झाला होता. यावेळी त्यांनी योग विज्ञान शिबिर घेतले, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका विधानानंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्यांच्या विधानाची दखल घेत त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर रामदेव बाबांनी (Yoga Guru Ramdev Baba) त्यांच्या वक्तव्याची माफी मागितली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने एक पत्र लिहून त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करायला लावली होती. त्यानंतर रामदेव बाबांनी दोन दिवसात आयोगाच्या पत्राला उत्तर दिले असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांनी (Yoga Guru Ramdev Baba) माफी मागितली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ‘बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती, याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे.’

ठाण्यात आयोजित झालेल्या रामदेव बाबांच्या योग शिबिरानंतर लगेच महिला महासंमेलन होणार होते. महिलांनी या कार्यक्रमात येताना योगासाठी ड्रेस आणि महासंमेलानासाठी साड्या आणल्या होत्या. पण योग्य प्रशिक्षणानंतर लगेच महासंमेलन सुरु झाल्याने महिलांना त्यांनी आणलेल्या साड्या घालायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे महिला थोड्या नाराज होत्या. तेव्हा बाबा रामदेव म्हणाले, ‘महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पहाल, तर काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात.’ त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर, महाराष्ट्र महिला आयोगात त्यांची तक्रार करण्यात आली होती.

झालेल्या प्रकारची खंत व्यक्त करत रामदेव बाबा त्यांच्या पत्रात लिहितात,”महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी, मी नेहमीच काम केले आहे.
केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत विविध धोरणांना मी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
यावरून हे स्पष्ट आहे की माझा महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता.
मी ठाण्यात किमान एक तास बोललो होतो पण सोशल मीडियावर आलेली क्लिप अतिशय छोटी असून तिचा प्रसार संदर्भाशिवाय होत आहे,
तरीही माझ्या वक्तव्याने कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.
माझ्या वक्तव्यामुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी बिनशर्त माफी मागतो.”

 

Web Title :- Yoga Guru Ramdev Baba | baba ramdev apologies for his remarks about women rupali chakankar tweets his letter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले