थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी करा ‘योगा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम- थायरॉईड ही मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाची ग्रंथी असून या ग्रंथीमार्फत तयार झालेले हार्मोन्स हृदयाचे ठोके, चयापचय, तापमान या गोष्टी नियंत्रित ठेवतात. थायरॉईडच्या या ग्रंथीमधून जर हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास थायरॉईडसंबंधीचे डिसॉर्डर म्हणजेच हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड होण्याची शक्यता असते. थायरॉईडची समस्या उद्भवल्यास त्याचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही परिणाम दिसून येतात. या समस्येवर मात कऱण्यासाठी योगा हा चांगला पर्याय आहे.

काही वर्षांपासून तरूण मुलींमध्ये थायरॉईडचे प्रमाण वाढले आहे. २० ते ५१ वयोगटातील तरूण मुली आणि महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त आहे. नियमितपणे योगा केल्याने व्यक्तीवरचा ताण-तणाव कमी होतो. तज्ज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार योगा केल्याने ताणतणावाच्या पातळीत घट होऊन शारीरीक आणि मानसिक आरोग्य सुधारते. ताण हा थायरॉईडच्या समस्यांशी संबंधीत असल्याने योगा थायरॉईडच्या समस्येसाठी उपयुक्त ठरते. योगासन आणि श्वसनाच्या विविध पद्धतींमुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होतो. थायरॉईडग्रस्त रूग्णांसाठी ताणतणाव कमी करणे गरजेचे असते. योगा केल्याने थकवा कमी होतो आणि मसल पेन कमी होते. योगामुळे मानेजवळील भाग ताणला गेल्याने ते थायरॉईडच्या ग्रंथीसाठी चांगले असते.