#YogaDay 2019 : महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – महिलांना अतिशय कष्टाची कामे करावी लागतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचे काम चालूच असते. कामाच्या गडबडीत महिलांना स्वतःकडे लक्ष दयायला अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिलांचा तर असा समाज असतो. कि आपण दिवसभर एवढं काम करतो. मग त्यात किती व्यायाम होत असेल. पण ते काम म्हणजे व्यायाम अजिबात नसतो. हे महिलांनी समजून घेतले पाहिजे. महिलांना योगा करण्याची गरज ही पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळे महिलांनी नियमित योगा करणे गरजेचे आहे.

महिलांसाठी योगाचे काय महत्व आहे ते खालीलप्रमाणे 

१) महिलांना सर्वांशी चांगले नातेसंबंध ठेवणे गरजेचे असते. त्यांच्यामुळेच घर टिकून राहते. त्यामुळे जोडीदार, आई-वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात. तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यांसारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते.

२) दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे संध्याकाळी गळून गेल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्ही जर रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केला. तर तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता.

३) तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना आणि चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल.

४) गर्भधारणा होण्यासाठी आणि चांगली प्रसूती होण्यासाठी महिलांना योग करणे गरजेचे आहे. प्रसूती नंतर वजन वाढते. या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा महत्वाचा आहे.

५) मासिक पाळी संदर्भातील काही आजार असतील तर ते योगामुळे बरे होतात. त्यामुळे महिलांना योगा करणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

सिने जगत

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

त्या’ मारहाण प्रकरणी अभिनेता विद्युत जामवालबाबत कोर्टाने दिला १२ वर्षांनी ‘हा’ महत्त्वाचा निकाल