गरोदरपणात ‘योग’ करणे किती बरोबर ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गर्भधारणेच्या दरम्यान योग करण्यासंदर्भात बरेच प्रश्न उद्भवत असतात. काही लोक यावेळी योग करणे फायदेशीर मानतात तर काहींनी त्यास नकार दिला आहे. दरम्यान काही तज्ञांनी सांगितले की गर्भधारणेदरम्यान योगासने केल्याने आपले शरीर निरोगी आणि सक्रिय राहते. गर्भधारणेदरम्यान योग केल्यास चक्कर येणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या टाळता येतात. अशात आज आपण योगाचार्य अतुलकुमार वर्मा यांनी सुचवलेल्या गरोदरपणात केली जाणारी योगासनं आणि काही टिप्स बाबत जाणून घेऊया…

सुरुवातीचे तीन महिने
या काळात गर्भ विकसित होत असतो आणि गर्भपात होण्याचा धोका देखील जास्त असतो. म्हणून, पहिल्या तीन महिन्यांत योगाचा केवळ वर-वर सराव करावा. उदाहरणार्थ, हळू हळू आपल्या मानेला आणि खांद्यांना गोलाकार फिरविणे, खांद्याच्या पूर्ण हालचाली म्हणजेच खांदे पूर्णपणे फिरविणे, आपल्या पावलांना गोल फिरवणे. जर आपण हे सर्व योग करू शकत नाही तर आपण सर्वात सोपा उज्जायी प्राणायाम करू शकता. आपण दररोज 10 मिनिटांसाठी हे करू शकता. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात हार्मोन रिलेक्सिन स्नायू, सांधे आणि संयोजी ऊतकांना आराम आणि शिथिल करण्यासाठी तयार होतात. तसेच या काळात उष्ट्रासन आणि सेतुबंधासन केले जाऊ शकते परंतु हे लक्षात ठेवा की हे करताना शरीरावर जास्त जोर देऊ नये. विशेष म्हणजे शीर्षासन आणि सर्वांगासन सारखे आसने या दरम्यान करू नये तसेच उडी मारण्यासारखी कोणतीही क्रिया आणि मत्स्येंद्रसन सारखे आसन देखील या काळात करू नये.

दुसरा तिमाही
– बाध कोनसाणा (बटरफ्लाय पोझ), कॅट-काऊ पोझ (मार्जारी आसन), मंडुकासनाचा सराव करावा.
– पश्चिमोत्तानासन (पुढे झुकणे), अधोमुख श्वानासन (डाउनवर्ड फेसिंग डॉग), शिशु आसन किंवा बालासन (चाइल्ड पोझ) यासारख्या फॉरवर्ड मोडचा देखील अभ्यास केला पाहिजे.
– या कालावधीत ताडासन, त्रिकोणासन, विरभद्रासन 2 यासारखे आसने देखील फायदेशीर आहेत.
– ताणल्या जाणाऱ्या किंवा पोटावर दबाव येणाऱ्या पोझेससारखे आसने जसे की नवासन (बोट पोझेस) प्लँक सारख्या पोझेस टाळाव्यात.
– पाठीवर झोपणे टाळावे. जर आपण हे केले तर आपला वेना कावा (म्हणजे की ती नस जी पायापासून हृदयापर्यंत रक्त परत पाठवते) आणि यूट्रस पर्यंत रक्त प्रवाहास थांबवते. यामुळे चक्कर येणे आणि श्वास घेण्यात त्रास देखील होऊ शकतो.
– तसेच शवासन देखील करावे.

तिसरा तिमाही
– हिप आणि छातीशी संबंधित, शरीराला संतुलित करणारे, आराम मिळणारे आसने करावीत.
– दुसऱ्या तिमाहीत सांगण्यात आलेल्या आसनांची येथे पुनरावृत्ती केली जाऊ शकते. त्यामध्ये मेडिटेशन (ध्यान) आणि प्राणायाम (उज्जायी, नदी शोदन, भ्रामरी) यांचा समावेश होतो.
– आपल्या पाठीवर झोपू नका.
– पाठीच्या कण्याशी संबंधित आणि पोटाची योगासने टाळावीत.

गरोदरपणात योग करण्याचे फायदे
– यामुळे गर्भावस्थेदरम्यानचा बदलता मूड, श्वास घेण्यास होणारी अडचण आणि पायांमध्ये सूज येणे कमी होते.
– लेबर पेनसाठी शरीर तयार होते.
– आईचे मुलाशी बॉन्डिंग मजबूत होते.

(टीप- गरोदरपणात योगा ट्रेनरच्या अंडरच योगासने करावीत.)