अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – योगामुळे शरीराची चरबी घटतेच, पण यामुळे व्यक्तीचा अहंकार आणि भीतीही दूर होते. शरीराचा आकार टिकवून ठेवण्यासाठी विविध योगासने केली जातात. पोटाची चरबी घटवण्यासाठी आणि स्लिम होण्यासाठी धनुरासन आणि भुजंगासन चांगले आहे. कमरेचे फॅट कमी करण्यासाठी चक्रासन नियमित करावे. तणाव दूर करणे व स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी ध्यानधारणाही केली पाहिजे.

कोणत्याही व्यायामाचा किंवा योगासनाचा पूर्ण लाभ त्याच्यासोबत योग्य आहार घेतल्याने मिळतो. त्यामुळे दिनचर्येत पौष्टिक आहाराचा समावेश केला पाहिजे. दिवसाची सुरुवात गरम पाणी व लिंबासोबत केल्यास उत्तम. एका दिवसात काहीजण ८ ते १० ग्लास पाणी पितात. जेणेकरून व्यायामानंतरही शरीर हायड्रेट राहू रहावे. फिटनेससाठी योगासनांशिवाय डान्सिंग, सायकलिंग आणि स्विमिंग करणेदेखील लाभदायक आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like