अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – योगा केल्याने शरीराला विविध फायदे होतात. शरीर सुडौल होतेच, शिवाय अनेक प्रकारचे आजार तुमच्या पासून चार हात लांबच राहतात. म्हणूनच हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय योगा आता परदेशातही केला जातो. योगामुळे शरीरातील चरबी घटतेच, पण यामुळे व्यक्तीचा अहंकार आणि भीतीही दूर होते. मन शुद्ध सात्विक होते. पोटाची चरबी घटवण्यासाठी आणि स्लिम होण्यासाठी धनुरासन आणि भुजंगासन चांगले आहे. तर कमरेची चरबी कमी करण्यासाठी चक्रासन करावे.

तणाव दूर करणे व स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी ध्यानधारणाही केली पाहिजे. कोणत्याही व्यायामाचा किंवा योगासनाचा पूर्ण लाभ त्याच्यासोबत योग्य आहार घेतल्याने मिळतो. त्यामुळे दिनचर्येत पौष्टिक आहाराचा समावेश केला पाहिजे. दिवसाची सुरुवात गरम पाणी व लिंबासोबत केल्यास उत्तम. एका दिवसात काहीजण ८ ते १० ग्लास पाणी पितात. जेणेकरून व्यायामानंतरही शरीराची आद्रता टिकून राहते. फिटनेससाठी योगासनांशिवाय डान्सिंग, सायकलिंग आणि स्विमिंग केल्यास फायद होतो.

आरोग्य विषयक वृत्त –

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष

मालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी

Loading...
You might also like