घरीच करा ‘ही’ योगासनं, ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होऊन टळेल हार्ट अटॅकचा धोका ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – जर शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नसेल तर अनेक समस्या उद्भवतात. जर रक्तप्रवाह सुरळीत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. याासाठीच आज आपण काही योगासनं जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त 20-30 मिनिटांचा वेळ लागणार आहे आणि तुम्ही ही योगासनं घरीच करू शकतात.

1) ताडासन – हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही हा त्रास दूर करू शकता. फुप्फुसाची क्षमता सुधारायची असेल तर यासाठी ताडासन खूप फायदेशीर ठरतं. ब्रिदींग टेक्निकनं ब्ल्ड सर्क्युलेशन चांगलं होऊ शकतं. प्रेग्नंसीच्या 3 महिने आधी जर ताडासन केलं तर क्षमता सुधारण्यासाठी फायदा होतो.

2) त्रिकोणासन – हे आसन केल्यानं शरीरात रक्तप्रवाह चांगला तर राहतोच सोबतच ऑस्टियोपोरोसिसची समस्याही दूर केली जाऊ शकते. विशेष म्हणजे गरोदरपणातही त्रिकोणासन केलं जाऊ शकतं. परंतु हे आसन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.