#YogaDay2019 : ‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत आणि चांगले रहावे यासाठी तुमची सेक्स पॉवर खूपच महत्त्वाचा घटक आहे. कारण सेक्स पॉवरचा परिणाम तुमच्या नात्यावर होतोच शिवाय तुमच्या मानसिकेतवरही होतो. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोक सेक्स पॉवरच्या समस्येने त्रस्त असतात. सेक्स ऊर्जेसाठी योगासनाचा कसा फायदा हे आपण आज जाणून घेणार आहोत. योगाभ्यासातून शरीरात ऊर्जा निर्माण होते असे योगतज्ञ सांगतात. सेक्स पॉवर जागृत करण्यासाठी सूर्य भेदन प्राणायम, कुंडलिनी योग व योग मुद्रा यांचा खूप मोठा फायदा होतो.

सूर्यऊर्जेचा केंद्रबिंदू म्हणजे कामवासना होय. कामवासना ही ऊर्जेद्वारा जागृत केली जाते. सूर्य भेदन प्राणायम, कुंडलिनी योग व योग मुद्रा नियमित केल्याने काही दिवसातच सेक्स जीवनावर अनुकूल परिणाम जाणवतो. आपल्या शरीरात सूर्य स्वर आणि चंद्र स्वर असे दोन स्वर असतात. जेव्हा शरीरात सूर्य सक्रीय होतो तेव्हा तुम्ही आक्रमक आणि उत्तेजित होतो. याचवेळी शरीरात सेक्स पॉवर जागृत झालेली असते.  वैवाहिक जीवन जगणाऱ्यांना माहीत असेल की, सेक्सनंतर व्यक्तीला थकवा जाणवतो. याचे कारण असे आहे की, त्यावेळी शरीरात चंद्र स्वर सक्रिय झालेला असतो. त्यामुळे सेक्सनंतर काहींना लगेचच झोप लागते.

लठ्ठपणा कामेच्छासाठी मारक

तुम्ही जर लठ्ठपणाने त्रस्त असाल तर वेळीच काळजी घ्यायला हवी कारण लठ्ठपणा तुमच्या सेक्स लाईफसाठी घातक आहे. लठ्ठपणामुळे कामवासनेत अरुची निर्माण होते. काहींना जेवण केलं की लगेचच झोप येते. लठ्ठपणामुळे त्यांना झोपेवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. लठ्ठपणामुळे आळस आणि सुस्ती येते. हा आळस आणि सुस्ती तुमची कामेच्छा मारण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असाल तर, वेळीच काळजी घ्यायला हवी. यासाठी तुम्ही योगसाधनेचा आधार घेऊ शकता.

दुबळेपणाचाही सेक्सवर परिणाम

जसा लठ्ठपणाचा सेक्स लाईफवर परिणाम होतो तसाच दुबळेपणाचाही सेक्स पॉवरवर परिणाम होत असतो. दुबळेपणा घालवण्यासाठी तु्म्हाला पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. आहारही वाढवावा लागतो. परंतु अधिकचा आहार न घेता योगाभ्यासानेही तुम्ही तुमचे स्नायू बळकट करू शकता. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनंद परत मिळवू शकता. सूर्य भेदन प्राणायम, कुंडलिनी योग व योग मुद्रा यांचा या सगळ्यासाठी विशेष फायदा होतो.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी

सिनेजगत

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

 

You might also like