योगेंद्र यादव यांना तामिळनाडुत अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

निवडणूक विषयक तज्ज्ञ ते राजकारणी असा प्रवास करणारे योगेंद्र यादव यांना तामिळनाडुतील तिरूवन्नामलाई जिल्ह्यात शनिवारी अटक करण्यात आली. प्रस्तावित आठपदरी सालेम-चेन्नई द्रुतगर्ती मार्गाला स्थानिक शेतकरी विरोध करत असताना योगेंद्र यादव हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यांना वाटेतच पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती स्वत: यादव यांनीच ट्वीट करून दिली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6aabe35-b384-11e8-b36a-1383383b1b9e’]

५५ वर्षीय यादव यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांना शेतकऱ्यांबरोब बैठक घेण्यासाठी नकार दिला. शेतकऱ्यांची भेट घेणे गुन्हा आहे का? कुठे आहे कायदा? असा सवाल ट्वीटकरून यादव यांनी केला आहे. यादव यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तामिळनाडू पोलिसांनी तिरूवन्नामलाई जिल्ह्यातील चेंगम गावात मला व माझ्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल आहे. येथील स्थानिक शेतकरी प्रस्तावित आठ पदरी द्रुतगती मार्गाविरूद्ध आंदोलन करत असून त्यांनी आम्हाला निमंत्रित केले होते.

परंतु, आम्हाला पोलिसांनी रोखले आहे. शिवाय, आमचे मोबाईल फोनदेखील पोलिसांनी काढून घेतले आहेत. अतिशय निर्दयीपणे आम्हाला धक्काबुक्की करत पोलिसांनी व्हॅनमध्ये बसवले. तामिळनाडुतील हा माझा पहिलाच अनुभव आहे. यादव यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये अशाच प्रकारे आपल्याल मागील एका आंदोलनातही बोलताना शासकीय आधिकाऱ्यांनी रोखले होते, असा आरोप केला आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fb30464f-b384-11e8-9c85-7149badd2a4b’]

दरम्यान, तामिळनाडू पोलिसांनी यादव यांचे आरोप फेटाळले आहेत. पोलिसांनी म्हटले आहे की, यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथे बैठक घेण्यापूर्वी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. कोणतीही कठीण प्रसंग उद्भवला असता तर यादव यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची होती.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी