Yogesh Desai IG Prisons Maharashtra | ताणतणाव व्यवस्थापनासाठी चांगले मित्र जोडा, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी (Competitive Exam Student) जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी चांगले मित्र (Best friend) जोडण्याचा सल्ला पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Prisons, West Division) योगेश देसाई (Yogesh Desai IG Prisons Maharashtra) यांनी दिला. ‘निरामय’ संस्थेच्या (Niramaya Organization) ‘किशोरी नारी प्रकल्पा’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग भावनांचे’ या निवासी प्रशिक्षण शिबिर आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात योगेश देसाई (Yogesh Desai IG Prisons Maharashtra) बोलत होते.

आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), ए. जी. डायग्नोस्टिकच्या डॉ. विनंती पाटणकर (A. G. Diagnostics Dr. Vinanti Patankar), संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन (Adv. S. K. Jain), प्रकल्प प्रमुख साधना पवार (Sadhana Pawar), उद्योजक गजेंद्र पवार (Gajendra Pawar), ज्योतिकुमार कुलकर्णी (Jyoti Kumar Kulkarni), प्रसाद कुलकर्णी (Prasad Kulkarni)यांची प्रमुख उपस्थिती होती.

योगेश देसाई (Yogesh Desai IG Prisons Maharashtra) म्हणाले, जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रचंड अडचणी येत असतात. त्या स्वत:पुरता न ठेवता मित्र आणि कुटुंबियांना सांगा. त्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शारिरीक आणि मानसिक क्षमतांबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्याची गरज आहे.

 

 

मिसाळ म्हणाल्या, ‘उच्च ध्येय, मनाची क्षमता, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी, सकारात्मकता, सहनशीलता आणि संघर्ष करण्याची तयारी हे गुण मुलींना यशस्वी करतात. यश मिळविल्यानंतरही जे जमिनीवर राहातात तेच उंच भरारी घेऊ शकतात. त्यासाठी संकटातील संधी ओळखून यश मिळविले पाहिजे.’

तीन दिवसांच्या शिबिरात वस्ती विभागातील सातशे विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.
शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, शैक्षणिक, समुपदेशन, स्वसंरक्षण आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार आहे.
ॲड. जैन यांनी प्रास्ताविक, साधना पवार यांनी स्वागत, दीपा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Web Title :   Yogesh Desai IG Prisons Maharashtra | Add good friends for
stress management, Deputy Inspector General of Prisons, West Division Yogesh Desai

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI