हैदराबाद एन्काऊंटर : बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशीच कारवाई झाली पाहिजे

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी ठार झाले. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यावर सर्वच स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असाना योगगुरु रामदेव बाबा यांनी बलात्कारी आणी दहशतवाद्यांवर अशीच कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रीया दिली आहे.

रामदेव बाबा यांनी याबाबद प्रतिक्रीया देताना म्हटलं आहे की, ज्या घटनांबाबत साशंकता असेल त्याबाबत न्यायालयात जायला हवे, असे म्हणत त्यांनी आजच्या घटनेचे समर्थन केले आहे. तसेच अशा प्रकारचे अपराधी कलंक असतात. अशा लोकांमुळे संपूर्ण देश आणि धर्म, संस्कृती बदनाम होत असते. जे दुष्कृत्य करतात त्याच्यासोबत आणि दहशतवाद्यांविरोधात त्याच ठिकाणी पोलिसांना, सैन्याला आणि निमलष्करी दलाला अशीच कारवाई करायला हवी. ज्या घटनांबाबत काही सासंकता असेल त्या घटना न्यायालयापर्यंत नेल्या पाहिजेत. त्यावेळीच कायदेशीर प्रक्रियेचा आवलंब केला पाहिजे असे परखड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद पोलिसांची चंबळच्या डाकुंशी तुलना
मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असे गृहित धरलं तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्या मिळाल्यानंतर आनंद होण स्वाभाविक आहे, मात्र, तसा न्या चंबळचे दरोडेखोरही द्यायचे, असे ज्येष्ठ वकील उज्वल निक यांनी सांगितले.

या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे. परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हयला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धतत चुकीची असल्याचे मत सामाजिक कर्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like