अबब ! UP मध्ये 816 कोटी खर्च करून उभारलं नवीन पोलीस ‘हेडक्वार्टर’, महाराष्ट्रात कधी होणार ‘अद्यावत’ HQ, जाणून घ्या

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) लखनऊ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस मुख्यालयाचे उद्घाटन केले. हे मुख्यालय 40 हजार चौरस फटामध्ये बांधण्यात आले असून यासाठी तब्बल 816 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यालय गोमती नगर येथे बांधण्यात आले असून मुख्यालयाच्या इमारतीला सिग्नेचर बिल्डिंग नाव देण्यात आले.

नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्यालयात पोलिस महासंचालकाच्या कार्यालयासह 18 इतर कार्यालये असणार आहेत. प्रयागराज येथील पोलीस मुख्यालय देखील या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. इमारतीमधील पोलीस अधिकार्यांचे कार्य़ालय मोठे आणि खास आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

 Yogi Adityanath
सिग्नेचर बिल्डिंगची रचना
या इमारतीमध्ये चार टॉवर एकमेकांना जोडण्यात आले आहेत. सगळ्यात वरच्या म्हणजेच 9 व्या मजल्यावर महासंचालकांचे सर्वात मोठे कार्य़ालय आहे. पोलीस माहासंचालक ओपी सिंह यांनी या कर्यालयातून कामकाज सुरु केले आहे. अन्य तीन टॉवर पैकी एका टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम तर एका ठिकाणी महासंचालकांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा करण्यात आली आहे. आठव्या मजल्यावर महासंचालक कार्यालयातील अधिकारी आणि त्यांचे कार्यालय असणार आहेत.

तळमजल्यावर एक पोलिस संग्रहालय, सर्व नियंत्रण कक्ष, पीआरओ कार्यालय, निवृत्तीवेतन कार्यालय, लायब्ररी आणि प्रतिक्षा कक्ष बांधण्यात आले आहेत. गृह विभागाचे म्हणणे आहे की, लखनऊ मध्ये बहुमजली पोलिस इमारत बांधण्यास मान्यता देण्यात आली होती. जेणेकरून पोलिसांच्या विविध शाखा आपापसात माहितीची देवाणघेवाण सुलभ करू शकतील. यामुळे पोलिसांच्या विविध तुकड्यांशी संपर्क साधण्यात आणि काम सुलभ करण्यात मदत होईल.

उत्तरप्रदेश सारख्या राज्यात तब्बल 816 कोटी रुपये खर्च करून पोलीस मुख्यालय उभारलं जात मग महाराष्ट्रात कधी अशी चर्चा राज्य पोलीस दलात होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यात भाजप सरकार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –