UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी, लखनऊमध्ये FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेश पोलिसांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. सदरील मेसेज मध्ये मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून देणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत लखनऊ च्या गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयाच्या व्हाट्सअँपवरती गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एक मेसेज आला. त्यात, मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देणार असल्याचं लिहलं होत. त्यानंतर एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करून पुढे योगी आदित्यनाथ त्यांचे कट्टर शत्रू असल्याचं म्हटलं आहे. या मेसेज नंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली.

मोबाईल नंबरच्या आधारे तपास सुरु

सदरील मेसेज एका मोबाईल क्रमांकावरून आल्याचं पोलिसांना आढळलं. त्यानंतर, पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत कार्यवाहीला सुरुवात केली आहे. तसेच त्या क्रमांकाच्या आधारावरच गुन्हा नोंद केला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं असून, हा नंबर कोणाचा आहे याचा पुढील तपास केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल

 

You might also like