‘Google सर्च’वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘दबदबा’, प्रियंका गांधी ‘पिछाडी’वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे किती लोकप्रिय आहेत याचा अंदाज आता गुगल सर्च वरून लावता येऊ शकतो. योगी आदित्यनाथ यांचा दबदबा गेल्या एक महिन्यापासून गुगलच्या सर्च इंजिनवर दिसून येत आहे. अखिलेश यादव, मायावती, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी यांना मागे टाकून योगी आदित्यनाथ सर्वात पुढे आहेत.

प्रियंका गांधी पाचव्या स्थानी

२१ जूनपासून १८ जुलैपर्यंत पाहणी केल्यानंतर आढळून आले की पूर्ण एक महिन्यात योगी आदित्यनाथ गुगल सर्चमध्ये सर्वात पुढे आहेत. गुगल ट्रेंड्सनुसार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बसपच्या प्रमुख मायावती तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि मायावती यांच्यात स्पर्धा आहे. प्रियंका गांधी सर्वात खालील म्हणजे पाचव्या स्थानावर आहे.

गुगल ट्रेंड्समध्ये नेटकरी सर्वात जास्त कोणाचं नाव सर्च करतात, हे दिसून येते. गुगल कडून या माहितीचा आलेख देण्यात येतो.

आरोग्यविषयक वृत्त