काँग्रेसची ‘शहजादी’ मुलांना शिव्या शिकवते : योगी आदित्यनाथ

रायबरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या वयात लहान मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत, त्यावयात ‘काँग्रेसची शहजादी’ त्यांना शिव्या द्यायला शिकवत आहे. अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी फातेहपुरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला. ज्या वयात लहान मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत, त्यावयात काँग्रेसची शहजादी त्यांना शिव्या द्यायला शिकवत आहे. हेच काँग्रेसचे खरे चरित्र आहे. असे योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी अमेठीत काही लहान मुलांनी ‘चौकीदार चोर है’ची घोषणा दिली होती. इतकेच नव्हे तर, लहान मुलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करत होते. असा व्हिडीओ वायरल झाला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनीही प्रियंका गांधींवर टीका केली होती. आणि आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला आहे.

विशेष म्हणजे, प्रियंका गांधी यांच्या समोर लहान मुले ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी करत आहे, त्यांना शिवीगाळ करत आहेत, ती मुलांच्या विकासासाठी चांगली गोष्ट नाही. असे म्हणत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा(NCPCR)ने निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रियंका गांधींची तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर, लहान मुलांना निवडणूक प्रचार आणि निवडणुकीसंदर्भातील गोष्टींमध्ये सामील करू घेऊ नये, हे तुम्ही सुनिश्चित करण्याचे सुचवले आहे. लहान मुलांचा वापर कोणतीही चिठ्ठी, घोषणबाजी आणि रॅलीमध्ये केला जाऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली होती.