‘या’ राज्यातील पोलिसांना साप्ताहिक सुट्टी जाहिर, महाराष्ट्र पोलिसांना कधी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने पोलिसांना मोठा दिलासा दिला असून यापुढे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस या गोष्टीची मागणी करत होते. त्यामुळे आता पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे ते हक्काची सुट्टी घेऊ शकतात. उत्तर प्रदेश प्रमाणेच आता महाराष्ट्र पोलीसांनाही साप्ताहिक सुट्टी कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलीस हे कोणतीही सुट्टी न घेता रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडत असतात. सणासुदीला देखील पोलिसांना कोणत्याही प्रकारची सुट्टी मिळत नसते. त्याचबरोबर सतत काम केल्याने त्यांच्या आरोग्यावर तसेच प्रकृतीवर देखील याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबियांसमवेत देखील वेळ घालवायला मिळत नाही. तसेच त्यांना मोठी सुट्टी देखील घेता येत नाही. मात्र आता पोलिसांना या निर्णयामुळे हक्काची सुटी मिळणार असून ते आपल्या कुटुंबियांसमवेत हि सुट्टी घालवू शकतात.

दरम्यान, याआधी सुट्ट्या नसल्यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये यावरून मोठ्या प्रमाणावर वाद होत असल्याचे देखील आढळून येत असे. त्यामुळेच योगी सरकारने हा पोलिसांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तसेच योगी सरकारप्रमाणे फडणवीस सरकार पोलीसांच्या साप्ताहिक सुट्टीचा निर्णय कधी घेतील याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like