तब्बल 76 वर्षांपासून अन्न-पाण्याविना राहणार्‍या योगी प्रल्हाद जानी यांचं निधन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गुजरातमध्ये तब्बल 76 वर्षांपासून अन्नपाण्याविना राहणार्‍या
योगी प्रह्लाद जानी उर्फ चुनरीवाला माताजी यांचे निधन झाले. गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील चराडा गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. जानी यांचा पार्थिव देह बनासकांठा जिल्ह्याच्या अंबाजी मंदिराजवळ आश्रमात ठेवण्यात आला आहे. गुजरातमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी आहेत. विना अन्न-पाणी राहणार्‍या योगी प्रह्लाद यांच्या दाव्यासंदर्भात शास्त्रज्ञांनी 2003 आणि 2010 मध्ये अभ्यास देखील केला होता.

अन्न-जल ग्रहण करण्याची गरज नाही कारण देवी मॉ ने जिंवत ठेवल्याचा योगी यांचा दावा होता. त्यांच्या शिष्यांनी सांगितले की, ’माताजी यांनी काही दिवसांआधी आपल्या मूळ स्थानावर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या गावी चराडा इथे घेऊन गेलो होतो. त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर आश्रमात त्यांचा पार्थिव देह ठेवला आहे.

गुरुवारी आश्रमातच त्यांना समाधी दिली जाणार आहे. इंस्टिट्यूट ऑफ फिजियोलोजी अँड अलाइड सायंसेस (डीआयपीएएस) च्या शास्त्रज्ञांनी आणि काही डॉक्टरांनी 2010 साली योगी जानी यांच्या दाव्याबाबत अभ्यास केला. 15 दिवस त्यांनी जानी यांचं निरीक्षण केले होते.