“योगीराज” नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

नाटक आणि पुण्याचे अतूट नाते आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अनेकांचे श्रद्धा संस्थान आहेत . आता पुणेकर रसिक प्रेकक्षकांना श्री. स्वामी समर्थांचा महीमा थेट रंगमंचावर पाहण्याकरिता  उपलब्ध होणार आहे. पुण्यातील रंगोदय पुणे या नाट्यसंस्थेने ‘योगीराज’ या नाटकाचे आयोजन केले आहे. या नाटकाचा शुभारंभ  दि. १३ आँक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ वा. भरत नाट्य मंदीर पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’af5df953-c6e2-11e8-b465-7588462afbef’]

नाटकाचे वैशिष्ट्य –

नाटकात स्वामींचे निस्सिम होवून गेलेले भक्त बसप्पा, बाळाप्पा, चोळप्पा तसेच सुंदराबाई , चिंतोपंत टोळ यांच्याशी असलेले भक्तीमय नाते उलगडुन दाखविण्यात आले आहे. अनेक चमत्कार व हितोपदेश स्वामींनी समाजाला दिलेले आहे. ते प्रत्यक्ष पाहण्याची संधीच जणु रसिक प्रेक्षक आणि स्वामी भक्तांना या नाटकाद्वारे मिळणार आहे. नाटकाचे लेखन गौरव देशपांडे यांनी केले असुन दिग्दर्शन संतोष ढेबे यांनी केले आहे. नाटकाची  निर्मिती कल्पना बेंगरुट व गणेश कुंजीर यांनी केली आहे.

PUNE : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील गाणे कुख्यात गुन्हेगारांना घेऊन केले चित्रित

नाटकात श्री स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका रंगोदय पुणेचे तरुण कलाकार अक्षय इंगळे यांनी साकारली आहे, तरी प्रेक्षकांनी हे नाटक जरूर पाहावे असे आवाहन नाटकाच्या टिम ने केले आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’213cc06c-c6e5-11e8-a374-59c78f72645a’]

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like