सावधान ! कमी वयाच्या लोकांना होतोय या प्रकारचा कॅन्सर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोणताही आजार हा शरीरासाठी नुकसादायक ठरतो. वाढत्या वयाबरोबर आजारपण जीवघेणे ठरु शकते. तर काही आजार असे असतात, ज्याकडे तरुण पणात जास्त लक्ष दिले जात नाही. मात्र, नंतर त्या समस्येचं रुपांतर मोठ्या आजारात होते. असाच एक आजार आहे तो म्हणजे पोटाचा कॅन्सर. या कॅन्सरबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्ये कॅन्सरचा हा प्रकार आढळून येतो. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, या प्रकारचा पोटाचा कॅन्सर इतर रोगांपेक्षा घातक स्वरुपाचा आहे. या आजारावर केमिओथेरपीचा देखील उपचार होत नाही. जास्त वय असलेल्यांना कॅन्सर होत असतानाच आता मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात होत आहे.

अल्पावधीत आपलं जीवन संपवून टाकणाऱ्या या कॅन्सर बाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. अनेकांनी या आजाराकडे लक्ष न दिल्याचे ऑन्कॉलॉजिस्ट सर्जन यांनी म्हटले आहे. या प्रकारचा कॅन्सर झालेल्या लोकांनी सुरुवातीला दुर्लक्ष केल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. सुरवातीला या आजराच्या लक्षणांना गांभीर्याने न घेतल्यामुळे हा आजार पसरत जातो.

या अहवालातील तज्ज्ञांनी १९७३ ते २००५ या वर्षीच्या रिपोर्टचा अभ्यास केला. त्यामध्ये कॅन्सरच्या आजाराने मृत्यू होत असलेल्यांची संख्या ७५ हजारांपेक्षा जास्त होती. त्यात तरुणांच्या तुलनेने कॅन्सरचा आजार असलेल्या वृद्धांचे प्रमाण २ टक्क्यांनी कमी होते. हा अहवाल जर्नल सर्जरी यामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधक अजून वेगवगेळ्या प्रकारे कॅन्सरचे मृत्यू होण्याची कारणे शोधत आहेत.