YONO SBI Car Offers | कार खरेदीवर मिळवा 50,000 रुपयांपर्यंत फायदा; YONO SBI ची विशेष ऑफर

नवी दिल्ली : YONO SBI Car Offers | तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा प्लान करत असाल आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये मिळणार्‍या ऑफर्सची संधी हातातून गेली असेल तर काळजी करू नका. फेस्टिव्ह सीझन सेलनंतर सुद्धा तुम्ही नवीन कार खरेदीवर चांगले डिस्काऊंट (Yono SBI Car Offer) घेऊ शकता.

 

भारतीय स्टेट बँक योनो (YONO SBI) नवीन कार खरेदीवर चांगली ऑफर देत आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंत फायदा घेऊ शकता. हा फायदा केवळ कार नव्हे, तर बाईकच्या खरेदीवर सुद्धा घेऊ शकता.

 

जाणून घ्या काय आहे ऑफर (SBI Yono Offers)

एसबीआय योनो अ‍ॅपद्वारे (SBI YONO APP) महिंद्राची एक्सयूव्ही किंवा रेनॉची कार खरेदी केली तर कार सोबतची एक्सेसरीज एकदम मोफत मिळेल. रेनॉ कार खरेदी केल्यास 5,000 रुपयांची एक्सेसरीज मिळेल.

 

महिंद्रा एक्सयूव्ही (Mahindra XUV) च्या खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंत एक्सेसरीज मिळेल.
टोयोटा सुद्धा नवीन कार खरेदी केल्यास 5,000 रुपयांपर्यंत एक्सेसरीज ऑफर करत आहे.

 

तसेच काही कंपन्या कॅश डिस्काऊंट देत आहेत. जर डॅटसन गो कार खरेदी केली तर 4,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट मिळू शकतो.
टाटा मोटर्स कारवर 5,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. (YONO SBI Car Offers)

 

टू-व्हीलरवर सुद्धा शानदार सूट (Discount Offers on Two Wheelers)

 

योनो अ‍ॅपवर हिरो स्कूटरवर 1500 रुपये डिस्काऊंट आहे. तसेच हिरो इलेक्ट्रिकच्या ई-बाईकवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल.

 

Web Title :- YONO SBI Car Offers | yono sbi offers on new car sbi discount on car offers on cars and bike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा